कृषी सेवा केंद्रांची तपासणी; दोषींचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:29 PM2020-01-31T12:29:59+5:302020-01-31T12:30:22+5:30

दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

Investigation of Agricultural Service Centers; Guilty license suspended | कृषी सेवा केंद्रांची तपासणी; दोषींचे परवाने निलंबित

कृषी सेवा केंद्रांची तपासणी; दोषींचे परवाने निलंबित

Next

लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात रासायनिक खताची साठेबाजी करून त्याची वाढीव दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने जिल्हाभरात पडताळणी मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कृषी विभागाने आवश्यकतेनुसार रासायनिक खते उपलब्ध केली होती. त्यात सवलतीच्या दरातील खतांचाही समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासण्याची शक्यताच नव्हती. तथापि, रब्बी हंगामातील पिके बहरत असताना उत्पादन वाढीसाठी या पिकांना खत देण्याची गरज निर्माण झाली होती. त्यात प्रामुख्याने युरिया या रासायनिक खताचा समावेश होता. जिल्हाभरातील शेतकरी या खताची मागणी करीत असताना काही भागांत शेतकऱ्यांना हे खत मिळणे कठीण झाले होते. शेतकºयांनी चौकशी केल्यानंतर कंपन्यांकडून खताचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. तर काही ठिकाणी खतांचा तुटवडा दाखवून निर्धारित मुल्यापेक्षा अधिक दराने खतांची विक्री शेतकºयांना करण्यात येत असल्याच्या तक्र ारी कृषी विभागाकडे करण्यात येत होत्या. या तक्रारींच्या पृष्ठभुमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी पंचायत समित्यांच्या कृषी अधिकाºयांसह सहाही तालुका कृषी अधिकाºयांना कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हाभरात खतविके्रत्या कृषीसेवा केंद्रांची तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, तालुका कृषी अधिकाºयांनी सुरू केलेल्या तपासणीत दोन कृषीसेवा केंद्रांत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या समक्ष या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी संबंधित कृषीसेवा केंद्र संचालकांना बोलाविण्यात आले. त्यात कारंजा तालुक्यातील दोनद बु. येथील विठू माऊली कृषीसेवा केंद्रात नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. य२२ात पॉस मशीनमध्ये नमद असलेला साठा आणि शिल्लक असलेला साठा न जुळने, पॉस मशीनच्या आधारे विक्री न करता आॅफलाईन पद्धतीने जादा दराने खतविक्री करण्याचा प्रकार निदर्शनास आला. जिल्हा अधीक्षक अधिकाºयांच्या समक्ष झालेल्या सुनावणीत सदर कृषीसेवा केंद्र संचालकाचे उत्तर असमाधानकारक आढळल्याने सदर कृषीसेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
 

शेतकºयांनी न घाबरता तक्रारी कराव्यात
शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनने आणि आॅनलाईन पद्धतीने करून त्याची माहिती कृषीसेवा केंद्रांनी ठेवणे आवश्यक आहे. तथापि, काही ठिेकाणी असा प्रकार होत नसल्याचे कृषी विभागाला आढळून येत आहे. तथापि, शेतकºयांनी तक्रारी केल्याशिवाय यावर कारवाई करणे अशक्य होते. त्यामुळे कोणत्याही कृषीसेवा केंद्रावर नियमांचे उल्लंघन करून शेतकºयांना खतांची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कृषीसेवा केंद्राची तक्रार शेतकºयांनी कृषी विभागाकडे करावी, असे आवाहन अधीक्षक कृ षी अधिकाºयांनी केले आहे.

जिल्ह्यात शेतकºयांना युरिया खत मिळत नसल्याच्या, तसेच जादा दराने या खताची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार कृषीसेवा केंद्रांची तपासणी करण्याच्या सुचना सर्व तालुकास्तरावर देण्यात आल्या आहेत. ही मोहिम पुढे सुरुच राहणार असून, नियमांच्या उल्लंघन प्रकरणी कारंजा तालुक्यातील एका कृषीसेवा केंद्राचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.
-एस. एम. तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

 

 

Web Title: Investigation of Agricultural Service Centers; Guilty license suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम