७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:50 PM2019-12-30T13:50:58+5:302019-12-30T13:51:08+5:30

पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.

Investigation of MNREGA scam in 79 Gram Panchayats |  ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!

 ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. या पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र १२ व १३ डिसेंबरला चौकशीच्या पहिल्या टप्प्यात ठराविक २० ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी पथक पोहचलेच नसल्याची वस्तूस्थिती ‘लोकमत’ने १६ डिसेंबरला प्रकाशित वृत्ताच्या माध्यमातून उघड केली. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या.
याशिवाय चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही विशेष ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे १७, १८, २०, २१, २६ आणि २७ डिसेंबरला नियोजित सर्व ग्रामपंचायतींमध्ये चौकशीसाठी पथक पोहचले असून आता शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली.
 
या ७ ग्रामपंचायतींमध्ये होणार उद्या चौकशी
१२ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणाºया ‘रोहयो’ कामांच्या चौकशी प्रक्रियेदरम्यान ठराविक त्या-त्या तारखेस १० पथकांकडून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींची चौकशी करण्यात आली. आता ३१ डिसेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील डव्हा, खिरडा, शिरसाळा, अमानी, झोडगा बु., केळी आणि गिव्हा कुटे या ग्रामपंचायत क्षेत्रातील कामांची चौकशी होणार आहे.


मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायत क्षेत्रात सप्टेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले. त्यानुसार, १२ डिसेंबरपासून १० पथकांमार्फत चौकशीस सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी पूर्ण झाली असून ३१ डिसेंबरला उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.
- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

 

Web Title: Investigation of MNREGA scam in 79 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.