‘त्या’ आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:46 AM2017-08-01T01:46:00+5:302017-08-01T01:49:49+5:30
कारंजा लाड : येथील किसनलाल नथमललाल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. गजानन पेढीवाल यांनी आत्महत्येप्रकरणी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत दोन जणांची नावे असून, त्या दिशेने चौकशी सुरू असल्याची माहिती पुणे कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्राचार्य डॉ. पेढीवाल हे रजेवर गेले होते. पुणे येथे बुधवार, २६ जुलै रोजी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर कोंढवा (पुणे) पोलीस स्टेशनने घटनेचा तपास सुरू केल्याची माहिती आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून, या चिठ्ठीत आणखी नेमकी किती नावे आहेत, याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
तपास अधिकारी संतोष शिंदे म्हणाले, की पेढीवाल यांच्या मुलाची फिर्याद व बयान घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. मृतक डॉ. पेढीवाल यांनी लिहून ठेवलेल्या ‘त्या’ चिठ्ठीत संचालक शरद चवरे व कार्यकारी प्राचार्य डॉ. मेघनाथ भावे यांचे नाव आहे.
दरम्यान, डॉ. पेढीवाल यांचा मुलगा अंत्यसंस्काराकरिता अकोला येथे गेला आहे. तेथे वडिलाचा अंत्यसंस्काराचा पूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर मुलाची फिर्याद व बयानानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे पुणे कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.