तुटलेला वीज खांब देतोय अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 04:32 PM2019-06-18T16:32:56+5:302019-06-18T16:33:14+5:30
आसेगाव: वाशिम-कारंजा दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर धानोरा ते मसोला फाट्याजवळ मुख्य वाहिनीचा वीज खांब मधोमध तुटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव: वाशिम-कारंजा दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर धानोरा ते मसोला फाट्याजवळ मुख्य वाहिनीचा वीज खांब मधोमध तुटला आहे. वादळी वाºयामुळे हा खांब रस्त्याने जाणाºया वाहनावर कोसळून अथवा रस्त्यावर कोसळून अपघात घडण्याची भिती आहे. तथापि, या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने वाशिम-मंगरुळपीर दरम्यान महामार्गाचे काम सुरू करण्यात आल्यानंतर या मार्गावर अडथळा येणारे वीजखांब महावितरकडून हटवून बाजूला करण्यात आले आहेत. काही खांब हलविण्याचे काम अद्यापही सुरू आहे. याच मार्गावर महावितरणच्यावतीने बसविण्यात आलेला एक खांब मधोमध तुटला आहे. धानोरा ते मसोला फाट्यादरम्यान अगदी रस्त्यालगत हा खांब असल्याने एखादवेळी हा वीजखांब कोसळल्यास अपघात घडण्याची भिती आहे. या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. मंगरुळपीर, अमरावती, यवतमाळ, दिग्रस, पुसद, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, पुणे आदि ठिकाणी येजा करणाºया परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहने, माल वाहतूक करणारे ट्रक अशा असंख्य वाहनांची यावर वर्दळ असते. अशात एखाद्या वाहनावर हा खांब कोसळल्यास जिवित हानी होण्याचीही भिती आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाºयामुळे हा खांब कधीही कोसळू शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन हा खांब तातडीने बदलावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि वाहनधारकही करीत आहेत.