वाळूंचे ढिगारे देतात अपघातास आमंत्रण

By Admin | Published: June 7, 2014 10:24 PM2014-06-07T22:24:52+5:302014-06-07T22:29:35+5:30

बांधकामासाठी उपयोगात येणारी वाळू रस्त्याच्या कडेला अवैधपणे साठवून ठेवली जात असल्याने अपघातास आमंत्रण मिळत असून,

Invitation to the accidents of sand | वाळूंचे ढिगारे देतात अपघातास आमंत्रण

वाळूंचे ढिगारे देतात अपघातास आमंत्रण

googlenewsNext

कारंजालाड : बांधकामासाठी उपयोगात येणारी वाळू रस्त्याच्या कडेला अवैधपणे साठवून ठेवली जात असल्याने अपघातास आमंत्रण मिळत असून, रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
अतिशय वर्दळीचे व गजबजलेले शहर म्हणून कारंजाचा उल्लेख होतो. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्याही वाढत असल्याने रहदारीसाठी शहरातील मुख्य रस्ते अरूंद पडू लागले आहेत. आधुनिकीकरणामुळे जुनी दुकाने पाडून त्याऐवजी नवी दुकाने व कॉम्प्लेक्स उभारणीची कामेही शहरात होत आहेत. या बांधकामासाठी वाळू आणि गिट्टीचा मोठय़ा प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. मात्र बांधकाम करीत असताना वाळू आणि गिट्टी सर्रासपणे रहदारीच्या रस्त्याच्या कडेला ठेवल्या जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील नविन बसस्थानक ते डॉ.आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक ते इंदिरा गांधी चौक, जयस्तंभ चौक ते सिंधी कॅम्प, रामासावजी चौक ते पोहा वेश या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर नवीन घर, दुकान आणि कॉम्प्लेक्स उभारणीची कामे सुरू आहेत. या कामासाठी लागणारी वाळू आणि गिट्टी मात्र रहदारीच्या रस्त्यावरच पडून असल्याचे दिसून येते. परिणामी रस्ता अरूंद होवून रहदारीला अडथळा येतो. तसेच वाळूंवरून मोटारसायकल घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत आहे. वाळूंच्या ढिगार्‍यामुळे आजवर शहरात अनेक अपघात घडले आहेत.
कॉम्प्लेक्स आणि घर उभारणीचे काम पूर्ण होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. हे काम पूर्ण होईपर्यंत या कामासाठी लागणारी वाळू आणि गिट्टी मात्र बिनदिक्कतपणे रस्त्याच्या कडेला पडून राहते. दिवसभर या रस्त्यावरून वाहने जात असल्याने वाळू संपूर्ण रस्त्यावर पसरत असून त्यावरून मोटारसायकल घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. सूचनेनंतरही वाळू रस्त्यावर टाकली जात असल्याने नगर परिषदेला निर्देशाला ह्यठेंगाह्ण लावला जात आहे.

** वाळूंच्या ढिगार्‍यामुळे होतात ह्यराडेह्ण


घर बांधणीचे कामे शहरातील प्रत्येक प्रभाग अथवा ग्रामपंचायतच्या अखत्यारित सुरू आहेत. घराचे बांधकाम करताना वाळू रस्त्यावर साठविल्या जात असल्याने ह्यराडाह्ण होत आहे.
वाळू आणि गिट्टीमुळे रहदारीला खोळंबा होत असल्याने वाद विकोपाला जात आहे. याशिवाय लहान मुले-मुली वाळूंवर खेळत असल्याने रेती दूरपर्यंत पसरत जाते. 
घर पुनर्रबांधणीचे काम करताना कंत्राटदार स्वत:च्या सोयीसाठी जाणीवपूर्वक बांधकामस्थळाजवळ वाळू व गिट्टी साठवून ठेवतो. परिणामी भांडणाला तोंड फुटते. 
वाळू आणि गिट्टीच्या सभोवताल विटांचा मोठा थर लावल्यास ते रस्त्यावर पसरणार नाही. परिणामी अपघातास आळा बसू शकतो. 

 

Web Title: Invitation to the accidents of sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.