अनुदानित बियाणांसाठी अर्ज मागविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:44+5:302021-05-11T04:43:44+5:30

महा-डीबीटी या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा लागणार आहे. शेतकरी स्वतःच्या मोबाइल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट इत्यादी माध्यमातून ‘महा-डीबीटी’च्या ...

Invited applications for subsidized seeds | अनुदानित बियाणांसाठी अर्ज मागविले

अनुदानित बियाणांसाठी अर्ज मागविले

Next

महा-डीबीटी या संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा लागणार आहे. शेतकरी स्वतःच्या मोबाइल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट इत्यादी माध्यमातून ‘महा-डीबीटी’च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्रामध्ये जाऊन त्यांची नोंदणी करावी. सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. अर्ज भरण्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.

Web Title: Invited applications for subsidized seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.