रास्तभाव दुकानांमधून होणार लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 03:00 PM2018-10-06T15:00:20+5:302018-10-06T15:00:29+5:30
वाशिम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत टाटा ‘ट्रस्ट’मार्फत लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दर्शविली असून शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमार्फत त्याचे वितरण होणार आहे.
वाशिम : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत टाटा ‘ट्रस्ट’मार्फत लोह व आयोडिनयुक्त मिठाचा पुरवठा करण्यास शासनाने मान्यता दर्शविली असून शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव दुकानांमार्फत त्याचे वितरण होणार आहे. त्याचा दर १४ रुपये प्रतिकिलो असणार आहे, असे शासनस्तरावरून कळविण्यात आले आहे.
राज्यातील औरंगाबाद, नाशिक, अमरावती या शहरांसह अन्य शहरांमधील शिधापत्रिकाधारकांनाही त्यांच्या मागणीनुसार रास्तभाव दुकानांमार्फत लोह व आयोडिनयुक्त तथा गुणवत्तापूर्ण मीठ (डबल फोर्टिफाईड) वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. सदर मिठाची वाहतूक त्या-त्या जिल्ह्यांच्या शासकीय गोदामापर्यंत टाटा ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहे. मिठाची साठवणूक करण्यासाठी गोदाम आणि तेथून रास्तभाव दुकानापर्यंत मीठ पोहचविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे.
शासनाने विहित केलेल्या पोषक द्रव्याच्या प्रमाणात शिधापत्रिकाधारकांना लोह व आयोडिनयुक्त (डबल फोर्टिफाईड) मीठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, अमरावती व नाशिक या जिल्ह्यांमध्ये; तर त्यानंतर मागणीप्रमाणे इतरही जिल्ह्यांमध्ये मिठाचा पुरवठा केला जाणार असल्याचे शासनाने कळविले आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम