मनरेगाच्या कामात अनियमितता

By admin | Published: January 17, 2015 12:32 AM2015-01-17T00:32:49+5:302015-01-17T00:48:08+5:30

वाईगौळचे ग्रा.पं.सदस्य व गावक-यांची वाशिम जिल्हाधिका-यांकडे तक्रार.

Irregularities in MNREGA work | मनरेगाच्या कामात अनियमितता

मनरेगाच्या कामात अनियमितता

Next

मानोरा (जि. वाशिम): पंचायत समिती मानोरा अंतर्गत येणार्‍या वाईगौळ येथे मनरेगाची ५0 लाख रू पयाची कामे सुरू आहे. सुरू असलेली कामे अंदाजपत्रकाप्रमाणे सुरू नाही. सुरू असलेली कामे जेसीबी मशिनने करून सरपंच, सचिव व प्रभारी गटविकास अधिकारी कांबळे हे संगनमत करून बोगस मजूर दाखवून लाखो रूपयाचे गैरव्यवहार करीत असल्याची तक्रार वाईगौळ येथील ग्रा.पं.सदस्य तथा गावकरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. वाईगौळ ग्रामपंचायतच्या वतीने गावात मनरेगाची ५0 लाख रूपयाची कामे सुरू आहे. सुरू असलेली कामे जेसीबी मशिनच्या साहाय्याने सुरू असून, काम अंदाजपत्रकानुसार होत नसून बोगस मजुराची नावे दाखवून सरपंच, सचिव व प्रभारी गटविकास अधिकारी कांबळे यांच्या संगनमतातून गैरव्यवहार करीत असल्याची तक्रार वाईगौळ येथील ग्रा.पं.सदस्य व गावकर्‍याने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून सदर प्रकरणाची तक्रार माजी सरपंच उमेश पांडूरंग राठोड यांनी मानोरा पंचायत समितीला दिली. मात्र सदर तक्रारीची चौकशी मानोर पंचायत समिती मार्फत करण्यात आली नाही. उलट येथील अधिकारी उर्मट भाषेत बोलतात व वरिष्ठाकडे तक्रार देण्याचा सल्ला देतात. निवेदनात असे नमुद केले आहे की या पूर्वी गावातील रस्त्याचे काम करताना ९७ हजार रूपयांचा अपहार केला. याबाबत विस्तार अधिकारी पी.ए.अवगण व नायसे यांनी अहवाल दिला. या आधारावर न्यायालयातून सरपंच व सचिव यांचेविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या प्रकरणात पुन्हा चौकशीचे आदेश देवून चौकशी अधिकारी म्हणून कांबळे यांना नेमण्यात आले. त्यांनी कामाचे लोकेशन बदलवून नायसे व अवगण यांचा अहवाल रद्द ठरवून कांबळे यांनी सरपंच यांच्या बाजूने निकाल दिला. यामुळे सरपंच, सचिव व प्रभारी गटविकास अधिकारी हे संगनमत करून गैरव्यवहार करीत असून चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे, असे निवेदन वाईगौळ येथील ग्रामस्थांनी दिले. दरम्यान प्रभारी गट विकास अधिकारी पी.डी.कांबळे यांनी पंचायत समितीकडे तक्रार प्राप्त झाली असल्याचे सांगीतले. अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: Irregularities in MNREGA work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.