बेलखेड येथील स्वस्तधान्य दुकानात अनियमितता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:14 PM2018-05-29T14:14:04+5:302018-05-29T14:14:04+5:30

कारंजा  : तालुक्यातील ग्राम बेलखेड कामठा येथील पांडुरंग चिमनकर यांनी स्वस्तधान्य दुकानदार शरद सुधाकर वानखडे यांचेविरूध्द केलेल्या तक्रारीची चौकशी निरिक्षण अधिकारी मंगरूळपीर व पुरवठा निरीक्षक कारंजा यांनी केली. या चौकशीत अनियमितता असल्याचे आढळून आले.

Irregularity in the rationing shop at belkhed | बेलखेड येथील स्वस्तधान्य दुकानात अनियमितता 

बेलखेड येथील स्वस्तधान्य दुकानात अनियमितता 

googlenewsNext
ठळक मुद्देस्वस्तधान्य दुकानदाविरूध्द शासकीय धान्याचा अपहार केल्या प्रकरणी कठोर कार्यवाही करण्याची मागणी पांडुरंग चिमनकर यांनी कारंजा तहसिलदार व वरिष्ठाकडे केली होती.त्यानुसार चौकशी होउन तहसिलदार यांच्या कडे अहवाल प्राप्त झाला. चौैकशी अंती अनियमितता आढळून आल्यामुळे  जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम यांचेकडे पुढील कार्यवाही करीता प्रस्तावित केले आहे.

कारंजा  : तालुक्यातील ग्राम बेलखेड कामठा येथील पांडुरंग चिमनकर यांनी स्वस्तधान्य दुकानदार शरद सुधाकर वानखडे यांचेविरूध्द केलेल्या तक्रारीची चौकशी निरिक्षण अधिकारी मंगरूळपीर व पुरवठा निरीक्षक कारंजा यांनी केली. या चौकशीत अनियमितता असल्याचे आढळून आले. तसा अहवाल कांरजा तहसिलदार यांच्याकडे सादर करून पुढील कार्यवाही करीता जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम यांच्याकडे प्रस्तावित करण्यात आला. त्यामुळे त्या स्वस्त दुकानदारावर कार्यवाही कधी होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 

 कारंजा तालुक्यातील ग्राम बेलखेड कामठा येथील स्वस्तधान्य दुकानदार शरद वानखडे हे स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातून गैरव्यवहार करीत आहेत. बोगस लाभार्थी निर्माण करून त्यांची शिधापत्रिका तयार करून धान्याची उचल करून अपहार करीत आहे. राशनकार्डात अविवाहीत असतांना बनावट पत्नी दाखउन बोगस राशनकार्ड बनविण्यात आले आहे. गावात राहत नसलेल्याची बोगस लाभार्थ्याच्या नावे राशनकार्डच्या माध्यमातून धान्याची उचल करीत आहे. अनेक वषार्पासून विवाह झाल्यानंतर बोगस राशन कार्ड बनविले आहे. त्यामध्ये बिपीएल, शेतकरी, एपिएल, अंत्योदय आदी योजनेमधील राशनकार्ड धारकांचा समोवश आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होउन गैरव्यवहार करून अफरातफर तसेच अनियमितता करणा-या स्वस्तधान्य दुकानदाविरूध्द शासकीय धान्याचा अपहार केल्या प्रकरणी कठोर कार्यवाही करण्याची मागणी बेलखेड कामठा येथील पांडुरंग चिमनकर यांनी कारंजा तहसिलदार व वरिष्ठाकडे केली होती. त्यानुसार चौकशी होउन तहसिलदार यांच्या कडे अहवाल प्राप्त झाला. त्या अहवालानुसार बोगस लाभाथीर्ची यादी डि १ रजिष्टरनुसार तपासणी करण्यात आली. तपासणी अंती बिपीएल योजनेतील २० शेतकरी  , एपिएल योजनेतील १३ अशा एकुण ३३ शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. तपासणी अंती रद्द केलेल्या शिधा पत्रिका वगळता बेलखेड येथील डि १ रजीष्टरप्रमाणे होणारा कोटा व मागणी केलेला धान्य कोटा आणि त्यामधील तफावतीच्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानदार शरद वानखडे यांनी लाभार्थ्यींना शिधापत्रिकेनुसार देण्यात आलेले धान्य व अतिरिक्त धान्य उचल केल्याची तफावत विवरण पत्रात नमुद केलेली आहे. स्वस्तधान्य दुकानदार वानखडे यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीकरीता गहु ५१.२७ किंक्टल तांदुळ ३४.७० क्ंिक्टल आणि साखर १.२७ कि. या प्रमाणे धान्याची नियतपेक्षा जास्त उचल करून धान्य व साखरेचा अपहार केल्याचे आढळून येते. त्यामुळे स्वस्तधान्य दुकानदार वानखडे यांनी महाराष्ट्र अनुसूचित वस्तू व अधिनियम १९७५ वस्तू व वितरणाचे नियम च्या कलम १८ चे उल्लंघन केल्याचे सिध्द होत आहे. चौैकशी अंती अनियमितता आढळून आल्यामुळे  जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम यांचेकडे पुढील कार्यवाही करीता प्रस्तावित केले आहे.

Web Title: Irregularity in the rationing shop at belkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.