जलसंधारणाच्या ३,८१७ कामांमधून ३३,५३२ हेक्टर जमीन सिंचनाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 01:55 PM2019-12-30T13:55:02+5:302019-12-30T13:55:44+5:30

लसंधारणाच्या ३ हजार ८१७ कामांमधून ३८ हजार ८५८ हेक्टर टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Irrigation of 3,817 hectares of land under irrigation works | जलसंधारणाच्या ३,८१७ कामांमधून ३३,५३२ हेक्टर जमीन सिंचनाखाली

जलसंधारणाच्या ३,८१७ कामांमधून ३३,५३२ हेक्टर जमीन सिंचनाखाली

Next

- सुनील काकडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलसंधारणाच्या कामांकडे विशेष लक्ष पुरविले. त्याची अपेक्षित फलनिष्पत्ती झाली असून जलसंधारणाच्या ३ हजार ८१७ कामांमधून ३८ हजार ८५८ हेक्टर टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामाध्यमातून ३३ हजार ५३२ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली असून चालू रब्बी हंगामातील पिकांच्या प्रश्न निकाली निघाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची १९३९ कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर २५.३३ कोटी रुपयांचा खर्च झाला असून २४ हजार ९०६ हेक्टरवरील पिकांच्या सिंचनाची सोय झाली आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत जिल्ह्यात १४३५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली. त्यावर ६.६२ कोटी रुपये खर्च झाले असून १८०१ हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली आली आहे. समृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्गअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या स्वरूपातील ८० शेततळे तयार करण्यात आले. त्यासाठी कुठलाही निधी खर्च झालेला नाही.
या माध्यमातून ३०८५ हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली आली आहे. वॉटरकप २०१९ या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाची ५२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी केवळ २७ लाखांचा खर्च झाला असून १३१६ हेक्टर शेतजमिनीवरील पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. सुजलाम्-सुफलाम् अभियानाअंतर्गत २९७ कामांमधून २१६८ हेक्टर, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारच्या १४ कामांमधून २५४ हेक्टर जमिन सिंचनाखाली आली असून ३८ हजार ८५८ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी दिली.

१७.९४ कोटींची बचत
समृद्धी महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान पूर्ण झालेल्या जलसंधारणाच्या ८० कामांच्या माध्यमातून ३५८८.२२ लक्ष घनमीटर उत्खनन झाले असून १७.९४ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

Web Title: Irrigation of 3,817 hectares of land under irrigation works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम