कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने सिंचन वांध्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:11+5:302021-01-08T06:12:11+5:30
भर जहागीर परिसरात सिंचन तलावातील पाण्याच्या आधारे पिकांचे सिंचन केले जाते. रबी हंगामात प्रामुख्याने गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी, कपाशी ...
भर जहागीर परिसरात सिंचन तलावातील पाण्याच्या आधारे पिकांचे सिंचन केले जाते. रबी हंगामात प्रामुख्याने गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी, कपाशी ही पिके आणि मसालावर्गीय हळद, आले, कांदा, लसून आदी पिके घेतली जातात. दरम्यान, पोषक वातावरणामुळे यंदा सर्वच पिके बहरली होती; मात्र मागील दोन महिन्यात बहुतांश फिडरवरून अल्प प्रमाणात कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने हळद, गहू, हरभरा, कांदा ही पिके सुकत चालली आहेत. महावितरणच्या अवकृपेने उद्भवलेल्या या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. तथापि, अनेक शेतकऱ्यांनी शेतातील विहिरींवर असलेल्या मोटारपंपासाठी स्वतंत्र वीजजोडणी घेतली. त्याचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
......................
कोट :
सातत्यपूर्ण तथा उच्चदाबाची वीज मिळत नसल्याने हळद, गहू ही पिके सुकत चालली आहेत. शेतातील विहिरीवर स्वतंत्र वीज जोडणी असतानाही नुकसान होत आहे. ही समस्या महावितरणने विनाविलंब निकाली काढायला हवी.
रामेश्वर तायडे
शेतकरी, भरजहागीर.