सिंचन व्यवस्थापनाचा प्रश्न झाला गंभीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 08:25 PM2017-11-14T20:25:27+5:302017-11-14T20:27:14+5:30
जलसंपदा विभागाने १ एप्रिल २०१६ पासून जिल्ह्यात नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी लागणारे साधारणत: ३५० कर्मचाºयांचे मनुष्यबळ देण्याकामी प्रचंड उदासिनता बाळगल्याने या सिंचन शाखा केवळ नावापुरत्याच उरल्या असून सिंचन व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जलसंपदा विभागाने १ एप्रिल २०१६ पासून जिल्ह्यात नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी लागणारे साधारणत: ३५० कर्मचाºयांचे मनुष्यबळ देण्याकामी प्रचंड उदासिनता बाळगल्याने या सिंचन शाखा केवळ नावापुरत्याच उरल्या असून सिंचन व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात १२८ लघू आणि ३ मध्यम प्रकल्प असून सदर प्रकल्पांवरून रब्बी हंगामात शेतकºयांना सिंचनासाठी पाणी देत असताना प्रकल्पांचे चोख व्यवस्थापन ठेवणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने १ एप्रिल २०१६ पासून नव्याने १० सिंचन शाखा निर्माण केल्या. मात्र, त्यासाठी आवश्यक ठरणाºया मनुष्यबळाच्या पदनिर्मितीचा निर्णय अद्याप झालेला नाही.
वाशिम जिल्ह्यातील नव्या सिंचन शाखांमध्ये उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, शाखा अभियंता, विभागीय लेखापाल, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, टंकलेखक, लघूलेखक, संगणक चालक, वाहनचालक, स्थापत्य अभियंयात्रीकी सहायक, दप्तर कारकून, कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली, संदेशक, नाईक, शिपाई, कालवा चौकीदार आदि तब्बल ३५० पदे नव्याने निर्माण करणे गरजेचे आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.