सिंचन विहिर लाभार्थी निवड यादी अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:00 PM2018-12-21T17:00:58+5:302018-12-21T17:01:42+5:30
रिसोड (वाशिम) - डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निवड याद्या जिल्हास्तरावरुन अद्याप पंचायत समितीला प्राप्त झाल्या नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) - डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निवड याद्या जिल्हास्तरावरुन अद्याप पंचायत समितीला प्राप्त झाल्या नाहीत. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भारिप-बमसंच्या पदाधिकाºयांनी २१ डिसेंबर रोजी गटविकास अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात सिंचन विहिर व अन्य लाभांसाठी लाभार्थींची निवड करण्यात आली. निवडपात्र लाभार्थींच्या याद्या पंचायत समिती स्तरावर आतापर्यंत प्राप्त होणे आवश्यक होते. पंचायत समिती स्तरावरील कृषी अधिकाºयांशी (विशेष घटक योजना) चर्चा केली असता, सदर याद्या जिल्हास्तरावरून अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत, असे सांगण्यात आल्याचे भारिप-बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष केशवराव सभादिंडे यांनी निवेदनात नमूद केले. लाभार्थी निवड झालेली असतानाही, याद्या प्राप्त होण्यास एवढा विलंब का लागत आहे, असा सवालही सभादिंडे यांनी उपस्थित केला. याद्यास विलंब होत असल्याने निवड यादीबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने निवड याद्या पंचायत समिती स्तरावर पाठवाव्या, अशी मागणी भारिप-बमसंचे केशवराव सभांिंदडे, विजय शिरसाट, अर्जुन देविदास डोंगरदिवे, विश्वनाथ पारडे, गिरीधर शेजुळ, लक्ष्मण शेजुळ, संतोष शिंदे, डॉ.गजानन घुले, माधव जाधव, सुखदेव शिरसाट, संगीत तायडे, प्रदीप खंडारे आदींनी केली.