अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थिनी संतप्त; प्रवाशांसह बस पोहोचली पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 01:59 PM2019-12-21T13:59:17+5:302019-12-21T14:00:12+5:30

शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला.

Irritated by irregular buses; The bus with the passengers reached the police station | अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थिनी संतप्त; प्रवाशांसह बस पोहोचली पोलीस ठाण्यात

अनियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थिनी संतप्त; प्रवाशांसह बस पोहोचली पोलीस ठाण्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार : मंगरूळपीर आगाराची नांदखेडा, शेदुरजना मोरे मार्गे मंगरूळपीर-पिंजर ही बस शाळेच्या वेळेत पोहचत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शुक्रवार, २० डिसेंबर रोजी विद्यार्थिनींनी शेलुबाजार येथे बसमध्ये चढून एकाही प्रवाशाला बसमधून खाली उतरू दिले नाही. सदर बस सरळ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. आगार प्रमुखांच्या आश्वासनानंतर विद्यार्थिनींना परत शेलुबाजार येथे सोडून देण्यात आले.
अनेक वर्षांपासून शिक्षणासाठी परिसरातील शेंदूरजना मोरे,नांदखेडा या गावातील विद्यार्थीविद्यार्थींनी या बसने शेलूबाजार येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. या गावातील विद्यार्थ्यांना एसटी बस शिवाय इतर पर्यायी सक्षम व्यवस्था नसल्याने बसवर अवलंबून राहावे लागते. परंतु महामंडळाची बस वेळेवर धावत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शुक्रवारी शाळेची वेळ होऊन गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी तक्रार नोंदविण्यासाठी बस मधून न उतरण्याचा निर्णय घेतला व बस सरळ मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये नेण्याचा अटृहास धरला. त्यामुळे स्थानिक शेलुबाजार चौकात जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांच्या मदतीने बस मंगरूळपीर पोलीस स्टेशनकडे रवाना करण्यात आली. तिथे संबंधित आगार प्रमुखांना बोलावून विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखासमोर समस्या मांडल्या. यापुढे दररोज वेळेच्या आत बस पोहचविण्याची मागणी केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद लांभाडे यांच्यासह पालक उपस्थित होते.

शाळा सुटेपर्यंत बस शाळेसमोरच उभी
शेलूबाजार येथील सर्व विद्यार्थ्यांना मंगरुळपीर पोलीस स्टेशनला घेवून गेलेली बस विद्यार्थिनींना सोडण्यासाठी शेलूबाजार येथे परत आली आणि शाळा सुटत नाही, तोवर शाळेच्या समोरच उभी होती. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थांना घेवून अंदाजे ५ वाजता पिंजरकडे रवाना झाली.
मानव विकास मिशन अंतर्गतविद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी विशेष गाड्या प्रत्येक आगाराला उपलब्ध करून देण्यात आल्या.परंतु महामंडळाने मानव विकासच्या उद्देशाला हरताळ फासत या गाड्या प्रवाशी वाहतूकीसाठी इतरत्र वापरत विद्यार्थ्यांना वाºयावर सोडले. याआधीही गाडी उशीरा येत असल्याने तिनवेळा थेट मंगरूळपीर आगार गाठून तक्रार केली होती. तरीसुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शाळेच्या वेळेत बस पोहचत नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे .या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन उभारू. - निकीता डगवाल, विद्यार्थीनी, शेंदूरजना मोरे.

Web Title: Irritated by irregular buses; The bus with the passengers reached the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.