‘कोरोना’च्या संशयित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 02:29 PM2020-02-03T14:29:57+5:302020-02-03T14:30:13+5:30
संशयीत रुग्णांना पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे संदर्भीत करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नोव्हेल कोरोना विषाणुच्या संशयित रुग्णांच्या उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी कशी घ्यावी, याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.
चीन मधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात नव्याने आढळलेल्या कोरोना विषाणूमुळे न्युमोनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. भारत सरकारने मुंबई, दिल्ली, कलकत्ता येथील आंतराष्ट्रीय विमान तळावर येणा-या प्रवाशांचे स्क्रिनिंग, तपासणी सुरु केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाशिम जिल्हयामध्ये होऊ नये म्हणून आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय कार्यक्षत्रामध्ये आरोग्य कर्मचा-यामार्फत सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. सदर सर्वेक्षण करून संशयीत रुग्णांना पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे संदर्भीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
नोव्हेल कोरोना विषाणूच्या संशयीत रुग्णांच्या उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापणा करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी काय घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन मोहिम सुरू करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा धोका पाहता नागरीकांनी गर्दीत जाणे टाळावे तसेच स्वच्छता बाळागण्याची गरज आहे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला.• स्वत:ला व इतरांना या आजारा पासून सुरक्षीत कसे ठेवावे, याचे माहितीपत्रक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरही उपलब्ध करण्यात आले आहे.• श्वसन संस्थेचा आजार, सर्दी किंवा फ्ल्यु सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तीशी निकट सहवास टाळणे,• हातांची नियमित स्वच्छता राखणे,• न शिजविलेले अथवा अपुरे शिजविलेले, शिळे असलेले मास खाऊ नये,• फळे, भाज्या व मासांहार न धुता खाऊ नये, खोकतांना-शिंकताना नाका-तोंडा समोर रुमाल ववा टिश्यू पेपरचा वापर करावा, वापरलेले टिश्यु पेपर ताबडतोब झाकण असलेल्या कचरा पेटीत टाकावे,• जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळावे, या आजाराची लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. आहेर यांनी केले.
जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात नोव्हेल कोरोना विषाणुसंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. या विषाणूच्या संशयित रुग्णांच्या उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना विषाणूबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी कशी घ्यावी, याबाबत माहिती दिली जात आहे. परदेशातून येणारे विद्यार्थी, व्यापारी आदींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. सद्यातरी वाशिम जिल्हयात कोरोना विषाणूचा संशयीत किंवा पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. परंतु या विषाणूपासून स्वत:च्या बचावासाठी सावध राहणे गरजेचे आहे.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद वाशिम.