अधिग्रहित विहीरधारकांचा प्रश्न सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:33 PM2018-12-16T17:33:54+5:302018-12-16T17:34:01+5:30
मालेगाव (वाशिम) : दुष्काळीस्थितीत पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे शंभरावर शेतकºयांच्या देयकांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
मालेगाव (वाशिम) : दुष्काळीस्थितीत पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे शंभरावर शेतकºयांच्या देयकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार अमित झनक यांनी सबंधीत तहसीलदार यांना ऊन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीत जलसेवा करणाºया शेतकरी मंडळीच्या या रखडलेल्या रक्कमबाबत संताप व्यक्त करून तातडीने ही रखडली देयके अदा करण्याचे निर्देश दिले होते. त्याची दखल प्रशासनाने घेऊन विहीर, कूपनलिका अधिग्रहीत केलेल्या शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.
मालेगाव पंचायत समितीत ऊन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी ऊपाययोजनाचे पूर्व नियोजन आणि आराखडा तयार करण्यासाठी सभा बोलावीली होती. सदर सभेला पं.स.सभापतीसह लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गावोगावची सरपंच, ऊपसरपंच आणि पदाधिकारी मंडळी आवर्जून उपस्थित होती. यावेळी मालेगावात चंद्रभागाबाई वाझुळकर, सुनिता बबनराव मिटकरी, रूपाली मानवतकर, नम्रता घुगे, सुधाकर मुळे, दयानंद व्यवहारे, कृष्णा देशमुख, सिंधुबाई चव्हाण, रेखाबाई मेटांगे, लक्ष्मी अवचार, ओम चतरकर, सदाशिवराव देशमुख, कैलासराव आंधळे, नामदेवराव वानखेडे(माऊली)सह अनेक सरपंच मंडळीनी त्यांंच्या गावात पाणी टंचाईच्या काळात अवघ्या ३०० ते ४०० रुपये रोजाच्या खर्चात शेतकºयांच्या विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करून पाणी टंचाई निवारण केले. अनेकांनी टँकरनेही अहोरात्र पाणी पुरवठा केला. मात्र या सेवेपोटी ठरलेली रक्कम मिळण्यास प्रचंड विलंब झाला होता. शेतकºयांच्या या समस्येवर अमित झनक यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना धारेवर धरून तातडीने अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरी, कूपनलिकांची रक्कम शेतकºयांना अदा करण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर मालेगाव पंचायत समितीने सबंधीत विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या शेतकºयांच्या खात्यात मोबदल्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.