‘एसटी’तील तिकीटांच्या घोळावर ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 02:39 PM2020-03-14T14:39:00+5:302020-03-14T14:39:21+5:30

एसटी महामंडळामार्फत ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.

'Issue and Start' procedure on ticket sales in ST | ‘एसटी’तील तिकीटांच्या घोळावर ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा उतारा

‘एसटी’तील तिकीटांच्या घोळावर ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा उतारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वाहकांकडून होणारा अपहार नियंत्रित करण्यासह प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे. या अंतर्गत प्रवासासाठी बस निघण्याच्या १५ मिनिटेपूर्वी संबंधित बसस्थानकाच्या फलाटावर बस उभी करून आरक्षीत आणि अनारक्षीत प्रवाशांची नोंद नियंत्रण कक्षाद्वारे केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक १२ मार्च रोजी जारी करण्यात आले आहे.
प्रवासी भारमानात किंवा संख्येत वाढ करण्यासाठी एसटी महामंडळामार्फत ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या पद्धती अंतर्गत बसस्थानकावर आलेल्या बसेसमध्ये प्रथम तिकिट घेऊनच प्रवास सुरू करणे आवश्यक आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. यामुळेच महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व विभागांना ही कार्यपद्धती त्वरीत कार्यान्वित करण्याबाबत सुचना देण्याचे निर्देश दिले आहेत. या पद्धतीत कोणतीही बस मार्गावर जाण्यापूर्वी प्रथम १५ मिनिटे फलाटावर उभी करण्यात येणार आहे. यावेळी बसमध्ये आरक्षीत प्रवाशांना त्यांच्या आसनावर बसण्याच्या सुचना देण्यासह आरक्षण तिकिटाशिवास बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना बसस्थानकावरच ईटीआय मशीनमधून तिकिटे देऊन वाहतूक नियंत्रण नोंदवहीवर त्या बसमधील प्रवाशांच्या संख्येची नोंद केली जाणार आहे. या पद्धतीमुळे वाहकांना अपहार करण्याची संधी मिळणार नसून, प्रवाशांनाही महामंडळाच्या कामकाजाबाबत आपुलकी वाटणार आहे. सर्व विभाग नियंत्रकांना या कार्यपद्धतीचा अवलंब करून माहिती सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

अवलंबातील दिरंगाईची घेणार गंभीर दखल
एसटी महामंडळाच्या सर्व विभागांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या आगारातील सर्व चालक, वाहक व वाहतूक नियंत्रकांना इश्यु व स्टार्ट कार्यपद्धतीबाबत माहिती देऊन सदर सुचना मिळाल्याची खात्री करून संबंधितांची स्वाक्षरी नोंदवहीत घेण्याचे निर्देश महामंडळाने दिले असून, या कार्यपद्धतीच्या अमलबजावणीत दिरंगाई झाल्याचे आढळल्यास महामंडळाकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे.
 
  ‘इश्यू व स्टार्ट’ कार्यपद्धतीची अमलबजावणी करण्याच्या सुचना महामंडळाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सर्व आगारप्रमुखांना या कार्यपद्धतीची अमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात येतील.
-चेतना खिरवाडकर,
विभाग नियंत्रक,
रा.प.म. अकोला विभाग

 

Web Title: 'Issue and Start' procedure on ticket sales in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.