पीक विमा योजनेचा मुद्दा पोहोचला संसदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:07+5:302021-02-15T04:35:07+5:30
शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने खासदार गवळी यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा ...
शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने खासदार गवळी यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न लोकसभेत जोरदारपणे मांडला. केंद्र शासन अथवा राज्य सरकारकडून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करत खासदार गवळी यांनी वाशिम- यवतमाळ या आपल्या लोकसभा मतदारसंघात रिलायन्स व इस्कॉटोकियो या दोन विमा कंपन्या किसान विमा योजनेचे काम पाहत असून, या कंपन्या चुकीचे, तसेच तुटपुंजा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर खोटेनाटे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याचे सांगितले. यामुळे संबंधित कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याप्रसंगी देशात ईस्ट इंडिया कंपनी आली की काय, अशी भीती वाटत असल्याचे मतही खासदार गवळी यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले.