वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दा थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 05:49 PM2018-12-30T17:49:27+5:302018-12-30T17:50:00+5:30

वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

Issue of organic commodity market in Washim pending | वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दा थंडबस्त्यात!

वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दा थंडबस्त्यात!

googlenewsNext

प्रशासनाची उदासिनता : सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गटागटाने शेती करणाºया जिल्ह्यातील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य उत्पादित केले जात आहे. मात्र, त्यास जोपर्यंत पुरेसे ग्राहक मिळत नाहीत, तोपर्यंत विशेष फायदा होणार नाही. ही बाब लक्षात घेवून मध्यंतरी ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला, विषमुक्त अन्नधान्य विक्रीसाठी इच्छुक ग्राहकांकडून मागणी नोंदवून वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.
जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि अन्य शेतमालाचे उत्पादन घेण्यास इच्छुक २८ शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. यामाध्यमातून सुमारे १२०० शेतकरी त्यांच्या ५६० हेक्टर शेतीवर सेंद्रिय भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य उत्पादनासाठी सज्ज आहेत. सावरगाव जिरे, काजळांबा, खरोळा, डही यासारख्या काही गावांमधील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतमालाचे उत्पन्न काढले जात आहे. मात्र,  तुलनेने अधिक खर्च लागत असलेल्या सेंद्रिय शेतीतून उत्पादित शेतमाल विक्रीसाठी संबंधित शेतकºयांना अद्यापपर्यंत वाशिम जिल्ह्यात कुठेच हक्काची बाजारपेठ अथवा पुरेसे ग्राहक मिळालेले नाहीत. त्यानुषंगाने ‘आत्मा’च्या वतीने शेतकरी व ग्राहकांचा थेट संपर्क करून देत वाजवी दरात सेंद्रिय शेतमाल विक्रीची बाजारपेठ उभारण्यासाठी तद्वतच सेंद्रिय शेतमाल खरेदी करू इच्छिणाºया ग्राहकांची यादी तयार करण्यात आली. त्यास नागरिकांमधूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, आॅनलाईन नोंदणी केलेल्या एकाही ग्राहकास सेंद्रिय शेतमाल विकत घेण्यासंबंधी कुणीच संपर्क साधत नसून इच्छूक ग्राहकांसाठी सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दाही सद्या थंडबस्त्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Issue of organic commodity market in Washim pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.