ग्रामीण भागात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:10+5:302021-05-14T04:41:10+5:30
वाशिम : ग्रामीण भागात शौचालये उभारण्यात आली आहेत; मात्र अधिकांश ठिकाणी त्याचा वापरच केला जात नाही. बहुतांश नागरिक आजही ...
वाशिम : ग्रामीण भागात शौचालये उभारण्यात आली आहेत; मात्र अधिकांश ठिकाणी त्याचा वापरच केला जात नाही. बहुतांश नागरिक आजही उघड्यावरच शाैचास जात आहेत. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
00000000000
मोरगव्हाणवाडी पांदण रस्त्याची दुरवस्था
वाशिम : रिसोड तालुक्यातील मोरगव्हाणवाडी येथील पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी १० ते १५ मीटर अंतराचे खड्डे पडले असून, गेल्या १७ वर्षांत एकदाही या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही.
0000000000
उमरदरी येथे कोरोना लसीकरण
किन्हीराजा : येथून जवळच असलेल्या उमरदरी येथे १२ मे रोजी ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. या मोहीमेस गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
.................
संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी
वाशिम : कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे. त्यानुषंगाने स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागत सतर्क झाला असून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.
.............
पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध
वाशिम : जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोव्हीड केअर सेंटरमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात ‘पीपीई कीट’ उपलब्ध असल्याची माहिती येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
.................
शेलूबाजार परिसरात जंतूनाशक फवारणी
शेलूबाजार : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात सदोदित स्वच्छता राखली जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सोबतच शेलूबाजार परिसरात या आठवड्यात ग्रामपंचायतच्यावतीने जंतूनाशकाची फवारणीही करण्यात आली.
...............
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागांत बुधवारी रुग्णांची तपासणी करण्यात आली.
..................
हातपंपाची दुरूस्ती करण्याची मागणी
विळेगाव घुले : परिसरातील काही गावांमधील हातपंप मागील अनेक महिन्यांपासून दिवसांपासून बंद आहे. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना हांतपंपावर पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून हातपंप दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
.................
जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या नादुरूस्त
मालेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास ५६ वर्गखोल्या नादुरूस्त आहेत. दुरूस्तीसाठी शासनाकडून निधीही मिळाला. त्यामुळे या वर्गखोल्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
.................
उन्हाची तीव्रता वाढली; जलस्त्रोत कोरडे
पोहरादेवी: यावर्षी मार्च महिन्यापर्यंत गावात पाणीटंचाई जाणवली नाही; मात्र मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच जलस्त्रोतांमध्ये घट होत असून भविष्यात गावाला पाणीटंचाई जाणवणार असल्याचे संकेत आहेत.