ग्रामीण भागात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:50+5:302021-07-03T04:25:50+5:30
................ संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी वाशिम : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शन्मुगराजन ...
................
संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी
वाशिम : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी केले आहे. त्याअनुषंगाने स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी केली जात आहे.
.............
सर्दी, खोकला रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून वाशिम तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत ग्रामीण भागात शुक्रवारी रुग्णांची तपासणी करण्यात आली.
..................
हातपंपाची दुरुस्ती करण्याची मागणी
वाशिम : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेले हातपंप बंद आहेत. ये-जा करणाऱ्या वाटसरूंना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून हातपंप दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
.................
शाळा सुरू; वर्गखोल्या नादुरुस्त
वाशिम : यंदाचेही शैक्षणिक सत्र विद्यार्थ्यांविना सुरू झाले. शाळेत ५० टक्के शिक्षकांनी उपस्थित राहून ऑनलाइन पद्धतीने शिकविणे सुरू आहे. दुसरीकडे वर्गखोल्या नादुरुस्तच असून, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
.................
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.