बँक कामकाजाबाबत सुधारित आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:45+5:302021-05-06T04:43:45+5:30
या आदेशानुसार बचत (सेव्हिंग) खातेधारक ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या बचत खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले ...
या आदेशानुसार बचत (सेव्हिंग) खातेधारक ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या बचत खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. खाते क्रमांकाचा शेवटचा अंक ० अथवा १ असल्यास सदर ग्राहकांना बँकेत केवळ सोमवारी प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे खाते क्रमांकाचा शेवटचा अंक २ किंवा ३ असल्यास मंगळवारी, ४ किंवा ५ असल्यास बुधवारी, ६ किंवा ७ असल्यास गुरुवारी आणि ८ किंवा ९ असल्यास शुक्रवारी बँकेत प्रवेश दिला जाईल. तसेच प्रत्येक महिन्यातील पहिला, तिसरा व पाचवा शनिवार बँकेच्या अंतर्गत कामकाजाचा दिवस राहील. त्यादिवशी ग्राहकांना त्यांच्या कामासाठी बँकेत प्रवेश असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
.....
दुध संकलन व विक्री वेळेत बदल
३० एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात संचारबंदी काळात दुध संकलन व विक्रीकरीता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली होती. या वेळेमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून दुध संकलन व विक्रीची वेळ आता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत राहणार आहे.