अनुदानाचे पैसे १५ दिवसात देणे बंधनकारक

By admin | Published: June 7, 2014 10:41 PM2014-06-07T22:41:34+5:302014-06-07T22:50:53+5:30

ग्रामसेवक अथवा गटसमन्वयकांना प्रस्ताव दिल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शौचालयाचे प्रोत्साहन अनुदान देणे बंधनकारक आहे

It is mandatory to give the grant money in 15 days | अनुदानाचे पैसे १५ दिवसात देणे बंधनकारक

अनुदानाचे पैसे १५ दिवसात देणे बंधनकारक

Next

वाशिम : ग्रामसेवक अथवा गटसमन्वयकांना प्रस्ताव दिल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शौचालयाचे प्रोत्साहन अनुदान देणे बंधनकारक आहे ते न मिळाल्यास पात्र लाभार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. यामुळे तालुकास्तरावरील यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. मुकाअ यांच्या या धोरणामुळे निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाला गती येईल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत निर्मल भारत अभियान व इतरर योजनांमधून बांधण्यात येणार्‍या शौचालय बांधकामाच्या व अनुदान वाटपाच्या कामाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक महिन्यांपूर्वी घेतला होता. तेव्हा मागील वर्ष भरापासून शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले न सल्यामुळे शौचालय बांधकामाला मोठया प्रमाणात अडथळा येत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली होती. मुळातच शौचालय बांधण्याची मानसिकता ग्रामीण भागातील लोकांनी नसते. ही मानसिकता तयार करण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर शासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न केले जातात. यासाठी मोठया प्रमाणात जाणीव जागृती करण्यात येते. महत्प्रयासाने लाभाथ्यरांने शौचालय बांधले तर त्याला प्रोत्साहन अनुदानासाठी तालुक्याच्या ठिकाणी खेटे घालावे लागतात. परिणामी दुसरी व्यक्ती शौचालय बांधण्यास धजावत नाही व शासनाप्रती अविश्‍वासाची भावनाही तयार होते. याबाबीमुळे एकुणच अभियानाला खिळ बसते आणि सर्व यंत्रणेला दोषी धरले जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी यांनी जिल्हा परिषेची सुत्रे हाती घेण्यापूर्वी वाशिम जिल्हयान सन २0१३-१४ या वर्षात शौचालय बांधकामाचे केवळ ५0 टक्के उद्दिष्ट साध्य झाले व यापैकी केवळ ३५ टक्केच अनुदान वाटप झाले होते. म्हणजे मुळातच शौचालय बांधण्याचे काम कमी व ज्यांनी काम केले त्यांना अनुदान वाटप नाही. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून पुढील दोन महिन्यात उर्वरीत सर्व लाभार्थ्याचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सुचना त्यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिल्या होत्या.त्र यानंतर या कामाने गती घेतली होती. मात्र हवी तशी गती येत नसल्याने जयवंशी यांनी निर्मल भारत अभियानाशी संबंधीत सर्व अधिकारी व कर्मचार्‍याचे वेतन कामाच्या टक्केवारीशी जोडले होते. परिणामी मागील वर्षी शौचालय बांधलेल्या सुमारे ७४ टक्के लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. सध्या मागील वर्षीचे २६ टक्के उद्दीष्ट बाकी असून त्यात नविन शौचालय बांधणार्‍या लाभार्थ्यांंची भर पडत आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे अनुदान वाटप करणे बाकी राहू नये, शौचालय बांधल्यानंतर पात्र कुटूंबांना लगेच लाभ मिळावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी विविध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. या कामाला गती देण्यासाठी मुकाअ रुचेश जयवंशी यांनी एक पाऊल पुढे टाकले असून अनुदान मिळण्यास उशिर होत असल्यास लोकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. यासाठी जिल्हा स्तरावरुन जाणीव जागृतीसाठी एक मािहती पत्रक तयार करण्यात आले असून यामध्ये तालुकानिहाय गटसमन्वयक व बी.आर.सी. यांचे चनाव व मोबाईल नंबरची यादी देण्यात आली आहे. शौचालय बांधून वापर करणार्‍या कुटूंबांनी संबंधीतांना आपला प्रस्ताव सादर केल्या नंतर १५ दिवसात अनुदान न मिळाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी ७३५0३७५९९९ या नंबरवर संपर्क साधावा असे या पत्रकात नमुद आहे. जिल्हयातील सर्वच ग्राम पंचायतीमध्ये या पत्रकाचे वितरण करण्यात येणार असल्याने शौचालय बांधकामा सोबतच गावातील इतर विकासकामांनाही गती येईल अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: It is mandatory to give the grant money in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.