वाहनांच्या गर्दीने पायी चालणेही झाले अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:56+5:302021-05-06T04:43:56+5:30
शासनाने अत्यावश्यक सेवेकरिता सकाळी ७ ते ११ ही वेळ आणि बँकेकरिता ३ वाजेपर्यंत वेळ दिल्याने खरेदीसाठी सर्व ...
शासनाने अत्यावश्यक सेवेकरिता सकाळी ७ ते ११ ही वेळ आणि बँकेकरिता ३ वाजेपर्यंत वेळ दिल्याने खरेदीसाठी सर्व जण एकच गर्दी करीत आहेत. यात भर म्हणून चारचाकी, दुचाकी, ट्रॅक्टर, ऑटो, मालवाहक गाड्यासुद्धा या रस्तावर आल्याने खूप गर्दी होत आहे. बरेच वेळा पायी चालणेही अवघड होत आहे. या गर्दीमुळे नागरिक जवळ जवळ येत आहेत. यातील अनेक जण मास्क न लावता फिरत आहेत तर काही मास्क हनुवटीवर ठेवून फिरत आहेत. यामुळे कोरोनासंसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मागील वेळी नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाने हा रस्ता बंद केला होता. त्यामुळे चारचाकी, दुचाकी, ट्रॅक्टर, ऑटो, मालवाहक गाड्या या रस्त्यावर येणे बंद झाले होते. या वेळीसुद्धा तशी व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.