महिला बचत गटांच्या व्यवसायवाढीस चालना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:25+5:302021-02-07T04:37:25+5:30
५ फेब्रुवारी रोजी महिला माविमच्या कारंजा येथील अल्पसंख्याक लोक संचलित साधन केंद्रात आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्र ...
५ फेब्रुवारी रोजी महिला माविमच्या कारंजा येथील अल्पसंख्याक लोक संचलित साधन केंद्रात आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्र अध्यक्ष छाया मोटघरे, माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार, आयसीआयसी बँकेचे विभागीय अधिकारी अमित शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाल्या, पूर्वी महिलांना घराबाहेर जायचे असल्यास विचारून जावे लागायचे, आता बचत गटात कार्यरत असल्याने त्या केवळ सांगून जातात. महिलेची प्रत्येक बचत ही तिच्या कुटुंबासाठी आहे. राज्यात विविध महामंडळे आहेत, त्यापैकी महिला आर्थिक विकास महामंडळ हे केवळ महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. माविमच्या महिला बचत एकत्र करून कर्ज देतात. राज्यातील माविमच्या साडेसोळा लाख महिलांनी आतापर्यंत विविध बँकांचे ४,५०० कोटी रुपये कर्ज घेऊन विविध उद्योग-व्यवसाय उभारले आहेत. कोविड काळात महिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासून बचत गटातून प्रत्येकी एक रुपया जमा करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ११ लाख २५ रुपयांची मदत केली आहे, हे विशेष.
..........................
बॉक्स :
महिलांसाठी लवकरच विमा योजना कार्यान्वित होणार
महिलांमध्ये मोठी संघटनशक्ती असल्याचे सांगून ज्योती ठाकरे म्हणाल्या की, महिला सतत कामात व्यस्त राहत असल्याने त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळेच बचत गटातील महिलांसाठी लवकरच ६० रुपयांत विमा योजना कार्यान्वित होणार आहे. दुर्दैवाने अपघात झाल्यास एक लाख आणि मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये देण्याची व्यवस्था या विमा योजनेत असणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली.