‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना एड्स नियंत्रणाबाबत मार्गदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 03:37 PM2018-12-03T15:37:25+5:302018-12-03T15:37:30+5:30
मालेगाव (वाशिम) : ग्रामीण रूग्णालय आणि नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एड्स नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ३ डिसेंबर रोजी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले.
मालेगाव येथे झाला कार्यक्रम : ग्रामीण रुग्णालय, संघटनांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : ग्रामीण रूग्णालय आणि नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने एड्स नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ३ डिसेंबर रोजी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना एड्स नियंत्रणासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक सोपान चोपडे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भारत कंदोई, मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप वाढवे, आय.सी.टि.सी. समुपदेशक विनोद रत्नपारखी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपक काळे, औषध निर्माता अभिजित मुंढरे, युवा मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर वनस्कर, किशोर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
समुपदेशक विनोद रत्नपारखी यावेळी म्हणाले, की मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे निर्माण होणाºया रोगलक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एच.आय.व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर हा टप्पा लगेचच सुरू होतो व काही आठवडे राहतो. एच.आय.व्ही संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते. हा कालावधी तीन महिने ते १५ वर्षे असू शकतो. तो व्यक्तीच्या रोगप्रतिकार क्षमतेवर अवलंबून असतो. एड्स टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक पांडुरंग खिल्लारे यांनी केले; आभार प्रदीप बगाडे यांनी मानले.