जय महेशच्या जयघोषाने वाशिम नगरी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:28 PM2018-06-21T15:28:39+5:302018-06-21T15:28:39+5:30
वाशीम - माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त महेश नवमी उत्सव समितीच्यावतीने २१ जून रोजी सकाळी स्थानिक श्रीराम मंदिर येथे भगवान महेशचे अभिषेक पुजन करण्यात आले. त्यानंतर शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
वाशीम - माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त महेश नवमी उत्सव समितीच्यावतीने २१ जून रोजी सकाळी स्थानिक श्रीराम मंदिर येथे भगवान महेशचे अभिषेक पुजन करण्यात आले. त्यानंतर वाशीम शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
स्थानिक शिवाजी चौक येथे नगराध्यक्ष अशोक हेडा, दागडीया, रोहीत सारडा, निलेश सोमाणी आदींनी हारार्पण करुन अभिवादन केले. नगराध्यक्ष हेडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुजन केले. तदनंतर स्थानिक काटीवेश येथे सारडा परिवाराच्यावतीने आईस्क्रीमचे वितरण, मारवाडी युवा मंचच्या वतीने थंडाईचे वितरण व हेडा परिवाराच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण शहरात जय महेशचा जयघोष करण्यात आला. यावेळी महिलांनी डोक्यावर कलश व लाल साडी तर पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करुन शोभायात्रेत सहभाग नोंदविला. शोभायात्रेत अतुल चांडक व विभा चांडक यांनी भगवान महेश व पार्वतीची भुमिका साकारली. युवकांनी नृत्याचा आनंद घेतला. शोभायात्रेत मोठ्या संख्येने युवक, युवक व समाजबांधव सहभागी झाले होते.