अंगणवाडी कर्मचा-यांचे जेलभरो आंदोलन, शेकडो अंगणवाडी कर्मचा-यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 05:14 PM2017-10-05T17:14:45+5:302017-10-05T17:14:55+5:30
अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले.
वाशिम: अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. आयटकच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वेळोवेळी मानधनवाढीसाठी राज्यशासनाकडे सनदशीर मागार्ने मागणी केली. परंतु त्याची दखल शासनाने घेतली नाही. म्हणून सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलनाचा मार्ग अनुसरला आहे.
अंगणवाडी कर्मचा-यांना मानधन वाढ व इतर मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या होत्या; परंतु दीड वर्ष उलटूनही त्या मागण्या तशाच आहेत. त्यातील एकही मागणी शासनाने निकाली काढली नाही असा आरोप अंगणवाडी कर्मचा-यांनी केला असून, शासनाच्या उदासीन धोरणाबद्दल अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या संघटनेकडून जेलभरो आंदोलनाचा इशारा अधिका-यांना निवेदनाद्वारे देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी अंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात आयटकचे कॉ. दिलीप उटाने, अध्यक्षा सविता इंगळे, कार्याध्यक्ष कॉ. डिगांबर एस. राठोड, सचिव मालती राठोड, उपाध्यक्ष पद्मा सोळंके, सहसचिव सीता तायडे, माधुरी पाठक, संघटन सचिव ज्योती देशमुख, कोषाध्यक्ष रंजना भिसे, जिल्हा संघटन संजय मंडवधरे, वाशिम तालुकाध्यक्ष किरण गिºहे यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीसांची उपस्थिती होती.