मंगरूळपीर येथे बहुजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 04:41 PM2018-11-18T16:41:12+5:302018-11-18T16:42:10+5:30

मंगरूळपीर : संविधानातील परिच्छेद १९ अन्वये देशातील प्रत्येक नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्यात आले असताना सरकारने त्यावर गदा आणली आहे.

Jail Bharo movement of Bahujan Kranti Morcha at Mangrulpir | मंगरूळपीर येथे बहुजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन!

मंगरूळपीर येथे बहुजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : संविधानातील परिच्छेद १९ अन्वये देशातील प्रत्येक नागरिकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्यात आले असताना सरकारने त्यावर गदा आणली आहे. या मुद्यावर आक्रमक पवित्रा अंगिकारत बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या महिला-पुरूष कार्यकर्त्यांनी मंगरूळपीर येथे रविवार, १८ नोव्हेंबर रोजी जेलभरो आंदोलन करून संताप व्यक्त केला.
राष्ट्रीय बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या सुचनेवरून आंदोलकांनी प्रथम ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शांततेच्या मार्गाने स्वत:ला अटक करून घेतली. यावेळी लोकशाहीची हत्या करणारी ई.व्ही.एम. मशिन फोडलीच पाहिजे, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलनी है, संविधान के सन्मान मे मुलनिवासी मैदान मे, आदी घोषणा देण्यात आल्या. 
बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आनंद इंगोले, साधना सुर्वे, सुनिता मनवर, दिव्या पाढेण, मंगला तायडे, ममता सुर्वे, लिलाबाई मनवर, शोभा इंगोले, उज्वला ढळे, वनिता इंदे, शारदा तायडे, माया भगत, सुमन सोनोने, प्रदिप पडघान, चंद्रमणी भगत, रत्नमाला भगत, अंबादास सोनोने, किसन कांबळे, सोनाजी इंगोले, संतोष पडवाल, अमोल इंगोले, मंदा श्रृंंगारे, माया भगत, संगीता कांबळे, भारती भगत, नंदू आडोळे, देवानंद सोनेने, गजानन भगत, अंबादास वैद्य, मधूकर निचळ, रमेश मनवर, रमेश भगत, कळणुजी मनवर, सोना इंगोले, संतोष पडघान, रामकृष्ण पंडित, ऋषिकेश पडघान आदिंनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

Web Title: Jail Bharo movement of Bahujan Kranti Morcha at Mangrulpir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.