२0 हजाराची लाच स्वीकारताना जमादारास अटक

By admin | Published: July 27, 2016 12:56 AM2016-07-27T00:56:13+5:302016-07-27T00:56:13+5:30

गुन्ह्यातील नावे वगळण्यासाठी लाच : रिसोड येथील घटना.

The Jamaat leader was arrested for accepting a bribe of 20 thousand rupees | २0 हजाराची लाच स्वीकारताना जमादारास अटक

२0 हजाराची लाच स्वीकारताना जमादारास अटक

Next

वाशिम : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यामधुन नाव वगळण्यासाठी २0 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी रिसोड येथील मराठा अर्बन को-ऑपरेटीव्ह सोसायटी समोर केली गेली.
रिसोड पोलीस स्टेशनमध्ये नातेवाईकाविरूध्द दाखल असलेल्या महिला अत्याचाराच्या (भादंवि ४९८) गुन्ह्यातील नावे वगळण्यासाठी नाईक पोलीस शिपाई नामदेव किसनराव महाले याने तक्रारदाराला ४0 हजार रूपयांची लाचेची मागणी केली होती. यात तडजोड होऊन २0 हजार रूपय देण्याचे ठरले. दरम्यान यासंबंधात तक्रारदाराने वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये २३ जुलै रोजी तक्रार दाखल केली. मंगळवारी ठरल्याप्रमाणे जमादार महाले याने तक्रारदाराच्या नातेवाइकाक डून २0 हजार रूपयाची लाच स्वीकारताच, सापळा रचुन बसलेल्या एसीबीच्या पथकाने महाले यांना ताब्यात घेतले. जमादार महाले याचेविरूध्द कलम ७ ,१३ (१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

Web Title: The Jamaat leader was arrested for accepting a bribe of 20 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.