वाशिम जिल्ह्यात ‘जमियत उलमा ए हिंद’चे आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 06:20 PM2018-11-23T18:20:43+5:302018-11-23T18:20:58+5:30
‘जमियत उलमा ए हिंद’ या संघटनेच्या वतीने वाशिम जिल्ह्यात शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मुस्लिमांना शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळण्याच्या मुख्य मागणीसह अन्य स्वरूपातील विविध प्रश्न निकाली काढण्यासाठी ‘जमियत उलमा ए हिंद’ या संघटनेच्या वतीने वाशिम जिल्ह्यात शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
शासनाने १९ जुलै २०१४ च्या निर्णयान्वये शासकीय, निमशासकीय सेवेत तथा शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते; परंतु विधिमंडळाने सदर आरक्षण प्रस्ताव ६ महिन्यात मंजूर केला नाही. या धोरणाविरूद्ध १८ नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या बैठकीत राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आज जिल्हाभरात मुस्लिम समाजबांधवांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले.