महिला पोषण पंधरवडा अंतर्गत जनजागृती कार्यक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 04:24 PM2019-03-12T16:24:01+5:302019-03-12T16:25:38+5:30

आसेगाव (वाशिम): एकात्मिक बाल विकास तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांत ८ मार्चपासून महिला पोषण पंधरवडा, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Janajagruti Program under Women Nutrition programme | महिला पोषण पंधरवडा अंतर्गत जनजागृती कार्यक्रम 

महिला पोषण पंधरवडा अंतर्गत जनजागृती कार्यक्रम 

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क 
आसेगाव (वाशिम): एकात्मिक बाल विकास तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांत ८ मार्चपासून महिला पोषण पंधरवडा, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथेही हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, येत्या २२ मार्चपर्यंत चालणाºया या कार्यक्रमांतर्गत बालक, युवक व महिला जनजागृतीच्या उद्देशाने पौष्टिक पोषण आहाराबाबत मार्गदर्शन, कुपोषित बालकांची तपासणी तसेच गरोदर माता आणि विद्यार्थी-पालकांच्या सभा व रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.   
महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाºया महिला पोषण पंधरवडा, जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आसेगाव येथील अंगणवाडी क्रमांक १, २ आणि ३ मध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मंगरुळपीर येथून प्रभात फे री काढण्यात आली. त्यानंतर ९ मार्चला अंगणवाडी केंद्रांत पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली, १० मार्चला कुपोषित बालकांची तपासणी व पालक सभेचे आयोजन करण्यात आले, ११ मार्चला लाभार्थींचे पालक व कुटुंबांतील सदस्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले, तर १२ मार्चला किशोरी आणि गरोदर मातांची सभा घेऊन त्यांना महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत १३ मार्चला सुदृढ बालक स्पर्धा आणि सभा, १४ मार्चना पौष्टिक पाककृती पोषण संमेलन, १६ मार्चला महिला-पुरुष शेतकरी सभा, १७ मार्चला पोषण रॅली, १८ मार्चला युवक सभा, १९ मार्चला ग्रामस्थांची सभा, २० मार्चला किशोरींच्या रक्ताल्पतेची तपासणी, २१ मार्चला सायकल रॅलीने जनजागृती, तर २२ मार्चला ग्रामपंचायतच्या सभा घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका लता चौधरी यांच्या मार्गदर्शनात अंगणवाडी सेविका अजिजा अहमद परवेज पठाण, जैबुन्निसा अब्दुल रशिद शेख, नलिनी प्रकाश भिसे, सायमा तहसीन परवेज, मदतनीस त्रिशीला ठोंबरे, आशा सेविकारईसा खानम शेख मुसा आणि निर्मला भिकाजी भगत या परिश्रम घेत आहेत.

Web Title: Janajagruti Program under Women Nutrition programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम