जनता कर्फ्यू : दुसऱ्या दिवशीही मालेगावात कडकडीत बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:19 PM2020-07-14T12:19:47+5:302020-07-14T12:19:58+5:30
१४ जुलै रोजी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून मालेगाव येथे १३ ते १५ जुलै या दरम्यान जनता कर्फ्यू पाळला जात असून, दुसºया दिवशीही १४ जुलै रोजी व्यापारी, नगर पंचायतसह नागरिकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
बाहेरगावावरून परतणाºया नागरिकांमुळे मालेगावसह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जून महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यात यामध्ये झपाट्याने वाढ होत असून, मालेगाव शहरातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बाहेरगावावरून परतणाºया नागरिकांची आरोग्य तपासणीही केली जात असून, तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरमध्येच संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने घेतले जात आहेत. मालेगाव शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील संदिग्ध रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन टेस्टिंग सुरू करण्यात आली. पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेणे व त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे सध्या सुरू आहे. दुसरीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही, मालेगाव बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत होती. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी, मोबाईल असोसिएशन, नगर पंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आदींनी पुढाकार घेत १३ ते १५ जुलै दरम्यान जनता कर्फ्यूची हाक केली. त्यानुसार १३ जुलै रोजी शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. दुसºया दिवशीही १४ जुलै रोजी सकाळपासूनच मालेगाव शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद आहेत. जनता कर्फ्यूला सर्वांचे सहकार्य लाभत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून आला. किराणा असोसिएशन, मोबाईल असोसिएशन, सराफा असोसिएशन, कपडा असोसिएशन, कृषी व्यवसायिक संघटना, स्टेशनरी व्यवसायिक, भाजीपाला यासह मालेगावकर, नगर पंचायतचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक यामध्ये सहभागी झाल्याने दुसºया दिवशीही जनता कर्फ्यू १०० टक्के यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.
शिरपूर येथेही जनता कर्फ्यू
मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथेही व्यापाऱ्यांनी १४ व १५ जुलै रोजी जनता कर्फ्यूची हाक दिली. पहिल्या दिवशी जवळपास ६५ टक्के दुकाने बंद होती. शिरपूर येथे जनता कर्फ्यूला १०० टक्के प्र्रतिसाद मिळू शकला नाही.