जानोरीत वीज कोसळली; जीवितहानी नाही
By admin | Published: June 11, 2017 02:15 AM2017-06-11T02:15:57+5:302017-06-11T02:15:57+5:30
सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही; पिंपळाचे झाड जळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: तालुक्यातील जानोरी येथे सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. यादरम्यान गावातील प्रकाश लुंगे यांच्या घरावर वीज पडली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र घराशेजारी असलेल्या पिंपळाचे झाड जळाले. दरम्यान, घरात असलेले प्रकाश लुंगे (५0) व विठ्ठल लुंगे (१८) यांना वीज पडल्यामुळे अंगात मुंग्या आल्यासारख्या वाटू लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वीज पडल्याने घरातील भांड्याचीसुद्धा पडझड झाली.
शेलूबाजार येथे संततधार !
शेलूबाजार: शेलूबाजार परिसरात १0 जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वादळासह विजेच्या कडकडात संततधार पाऊस झाला. पहिल्याच पावसाने अडाण नदीला पूर आला तर शेलूबाजार चौक जलमय झाला. दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे. शेलूबाजारात सव्वा तास संततधार पाऊस झाल्याने सर्व चौक झाले जलमय होते. नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. चौकातील अनेक प्रतिष्ठानात पुराचे पाणी घुसले. सायंकाळी ५:३0 वाजताचे सुमारास सुरू झालेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. अडाण नदीला पूर गेल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आठवडी बाजारातील पुलावरून पाणी वाहल्याले काही तास रस्ता बंद झाला होता.
दरम्यान, वाशिम शहरातही दुपारच्या सुमारास पाऊस झाला.