गोकुळाष्टमी उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:06 PM2017-08-16T14:06:05+5:302017-08-16T14:06:32+5:30

वाशिम : स्थानिक भक्तीधाम, राधाकृष्ण मंदीर तिरुपती सिटी या वसाहतीमध्ये १४ व १५ आॅगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपालकाला व भजनसंध्येचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

janmashtami celebrated | गोकुळाष्टमी उत्सव

गोकुळाष्टमी उत्सव

Next

वाशिम : स्थानिक भक्तीधाम, राधाकृष्ण मंदीर तिरुपती सिटी या वसाहतीमध्ये १४ व १५ आॅगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपालकाला व भजनसंध्येचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

येथे १४ आॅगस्ट रोजी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत राजेश सोमाणी महाराज यांच्या वाणीतून कृष्ण लिलामृत व जन्मावर भजन झाले. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती लाभली होती. तसेच १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता विठ्ठल महाराज इरळा यांच्या काल्याचे कीर्तनानंतर दुपारी १२ ते ४ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमीत्त वसाहतीच्या मुख्य प्रवेशव्दारावर भव्य असा तिरंगाही यावेळी साकारण्यात आला होता. संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये लहान बालकांना श्रीकृष्णांची भूमिका साकारली होती तर महिलांनीही डिजेच्या तालावर नृत्य करुन मिरवणुकीला रंगत आणली होती. श्रीकृष्णांच्या गितांनी, भजनांनी संपूर्ण परिसर दुमदूमून गेला होता. बाळ गोपाळाच्या हाताने दहिहांडी फोडल्यानंतर भाविकांना गोपालकाल्याचे वाटप करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासठी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीने परिश्रम घेतले.

अतिशय शिस्तबध्द पध्दतीने समितीच्यावतिने कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Web Title: janmashtami celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.