Janta Curfue : रिसोड येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 02:51 PM2020-03-22T14:51:18+5:302020-03-22T14:51:28+5:30

२२ मार्च रोजी रिसोड शहर व तालुका कडकडीत बंद ठेवला. 

Janta Curfue: Closed tight at Risod | Janta Curfue : रिसोड येथे कडकडीत बंद

Janta Curfue : रिसोड येथे कडकडीत बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : कोरोना आजाराची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला रिसोडकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत २२ मार्च रोजी रिसोड शहर व तालुका कडकडीत बंद ठेवला. 
सकाळी ७ वाजेपासूनच रिसोड शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काही खासगी हॉस्पिटल व मेडीकल वगळता इतर सर्व प्रकारच्या सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या. एरव्ही गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेले लोणी फाटा, आंबेडकर चौकात रविवारी शुकशुकाट दिसून आला. शहरातील बसस्थानक, सिव्हिल लाईन, आंबेडकर चौक, लोणी फाटा, नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, सितला माता, बाजार समिती, वाशिम नाका आणि मुख्य बाजारपेठ यासह महामार्ग निर्मनुष्य असल्याने ओस पडले. रस्त्यावर वाहनेदेखील दिसत नाहीत. शहरात सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असून, ‘जनता कर्फ्यु’च्या पृष्ठभूमीवर रिसोडकरांनी २१ मार्च रोजी देखील शहरात बंद पाळला होता. तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी जनता कर्फ्यूसंदर्भात शहर व तालुकावासियांना बंद पाळण्याचे आवाहन केले होते. शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांनी काळापासूनच आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

Web Title: Janta Curfue: Closed tight at Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.