गरीब विद्यार्थ्यांंना ‘जेसीआय’चा मदतीचा हात!

By Admin | Published: October 23, 2016 01:35 AM2016-10-23T01:35:28+5:302016-10-23T01:35:28+5:30

सामाजिक बांधीलकीसाठी उपक्रम; ११ होतकरु विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती.

JCI help poor students | गरीब विद्यार्थ्यांंना ‘जेसीआय’चा मदतीचा हात!

गरीब विद्यार्थ्यांंना ‘जेसीआय’चा मदतीचा हात!

googlenewsNext

वाशिम, दि. २२- गोरगरीब विद्यार्थ्यांंंच्या शिक्षणात पैशाअभावी अडचण निर्माण होऊ नये, याकरिता जेसीआयच्यावतीने मदतीचा हात पुढे करीत विविध शाळेतील विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. यामध्ये अकरा विद्यार्थ्यांंंना २२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करून गरीब विद्यार्थ्यांंंना मदतीचा हात दिला आहे.
जेसीआय या सामाजिक संघटनेच्यावतीने शहरात विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात. पैशाअभावी शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये व तसेच होतकरु, गरजू विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्ती वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. शहरातील विविध शाळांतील अकरा विद्यार्थ्यांना एकूण बावीस हजारांची शिष्यवृत्ती यावेळी प्रदान करण्यात आली. शहरातील विविध शाळेच्या अकरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजाराचा धनादेश सुपुर्द करण्यात आला, त्यामध्ये सर्मथ स्कूलच्या चार, बाकलीवाल शाळेच्या तीन, तर एसएमसी आणि शिवाजीच्या प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. येथील सावित्रीबाई फुले कन्या कनिष्ठ महाविद्यालयात संस्थाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर आणि जेसीआय अध्यक्ष पंकज बाजड यांच्या हस्ते विद्यार्थिनीला धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी जेसीआय वाशिमचे संस्थापक अध्यक्ष सुनील चांडक, उपप्राचार्य विनायक दुधे, प्रा. सुनील उज्जैनकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

समाजातील होतकरू, गुणी अशा गरजवंत विद्यार्थ्यांना जेसीआयकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये, या हेतूने सदर उपक्रम राबविला जातो. सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.
-पंकज बाजड
जेसीआय अध्यक्ष, वाशिम.

Web Title: JCI help poor students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.