शेलूबाजार-तऱ्हाळा बायपास सर्व्हेक्षणाचे काम सुरु!
By admin | Published: June 16, 2017 07:57 PM2017-06-16T19:57:22+5:302017-06-16T19:57:22+5:30
शेलूबाजार: मागील कित्येक वर्षीपासुन रखडलेल्या शेलूबाजार, तऱ्हाळा बायपासचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाच्या कामावरुन दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार: मागील कित्येक वर्षीपासुन रखडलेल्या शेलूबाजार, तऱ्हाळा बायपासचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता सुरु असलेल्या सर्व्हेक्षणाच्या कामावरुन दिसून येत आहे. १६ जूनपासून या कामाच्या सर्व्हेक्षणास सुरुवात झाली आहे.
नागपुर - औरंगाबाद दृतगती मार्गाच्या निर्मितीनंतर शेलूबाजार तऱ्हाळा बायपासचे काम रखडले होते , त्यामुळे शेलूबाजार सह तऱ्हाळा गावातून जाणाऱ्या मार्गावरील जडवाहतुकीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावे लागत आहे.त्याच बरोबर वारंवार चौकात वाहतुकीचा जाम होण्याचे प्रकार घडत आहे.मागील कित्येक दिवसांपासून बायपासचे काम सुरु करण्याची मागणी नागरिक करित होते १६ जून रोजी सकाळी शासनाच्या आदेशाने मुंबई येथील जेएनएसएस कंपनीच्यावतीने सर्व्हेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. या संदर्भात सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनी संबधीतांना विचारणा केली असता ते म्हणाले की लाठी- शेलूबाजार हे ३.२०० व तऱ्हाळा २ किलोमिटर बायपासचे सर्व्हेक्षण तसेच बरोबरच जालना ते पुलगांवपर्यंत जवळपास २८० किलोमिटर अंतर रस्त्यावर नुतनीकरण करुन चारपदरी मागार्ची निर्मिती होणार आहे . त्याकरिताच हे सर्व्हेक्षण सुरु असल्याची माहीती त्यांनी दिली.