'जो बोले सो निहाल..’च्या जयघोषाने वाशिम नगरी दुमदुमली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:28 PM2018-11-24T17:28:10+5:302018-11-24T17:28:27+5:30
वाशिम : गुरूग्रंथाचा अखंडपाठ, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम... 'जो बोले सो निहाल, संत श्री अकाल'चा जयघोष, अशा उत्साहात वाशिम शहरात शुक्रवार २३ नोव्हेंबरला गुरूनानक देवजी यांची ५४९ वी जयंती साजरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गुरूग्रंथाचा अखंडपाठ, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम... 'जो बोले सो निहाल, संत श्री अकाल'चा जयघोष, अशा उत्साहात वाशिम शहरात शुक्रवार २३ नोव्हेंबरला गुरूनानक देवजी यांची ५४९ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सिंधी, सिख व ईतर समाजाचे सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगाला अध्यात्मिकता, मानवता, भक्ती, सत्य, शिक्षण अशा मूल्यांचं महत्त्व पटवून देणाºया गुरूनानक देवजी यांची सिंधी बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने गुरुद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजावट करण्यात आली होती. गेल्या आठवडाभर जयंतीनिमित्त गुरूग्रंथाचे पठण, सिंधी सुरीली शाम, आनंद मेळावा, रंगारंग कार्यक्रम, विविध खेळांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शीख धमार्चे संस्थापक व पहिले धर्मगुरू गुरुनानक यांची जयंती शहरात उत्साहात साजरी केली.
शुक्रवारला निघालेल्या पालखी सोहळ्यामध्ये विविध भजन, गाण्यांच्या तालावर तरूणांनी जल्लोष साजरा केला. जयंतीच्या दिवशी पूजा विधी नंतर लंगर म्हणजे महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोकुलसेठ जीवनानी, धन्नुमल जीवनानी, चेतनदास चांदवाणी, बन्सीलाल बदलानी, चंद्रकांत जीवनानी, लालचंद आसुदानी, कृपालदास हरचंदानी, किरन बदलानी, विनोद बंसंतवानी, प्रभुदास जीवनानी, सुनिल जीवनानी, निलेश जीवनानी, पप्पू नेनवानी, दिलीप केसवानी, पमन नेभवानी, अनिल केसवानी, शंकर जीवनानी, सोनु चंदनानी, अमित जीवनानी, सुनिल सदनानी, अजय चांदवानी, बंटी तोलानी, प्रेम बदलानी यांच्यासह शेकडो समाजबांधवांनी परिश्रम घेतले.