दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या अभियानात सहभागी व्हा! - सुदर्शन जैन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:21 PM2018-04-25T17:21:04+5:302018-04-25T17:21:04+5:30

कारंजा : सध्या महाराष्ट्रात पाणी समस्येने उग्ररूप धारण केले असून यासाठी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकती व पायपिट करावी लागत आहे. वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात आला आहे.

Join Drought-Free Maharashtra's Mission! - Sudarshan Jain | दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या अभियानात सहभागी व्हा! - सुदर्शन जैन 

दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या अभियानात सहभागी व्हा! - सुदर्शन जैन 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातील तीन हजार गावांना अडीचशे तास जेसीबी मशिन व शंभर तास पोकलॅन्डचा खर्च भारतीय जैन संघटना देत आहे. कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धा २०१८ मध्ये सहभागी झालेल्या गावातील सरपंच मेळाव्यात त्यांनी वरील मार्गदर्शन केले.

कारंजा : सध्या महाराष्ट्रात पाणी समस्येने उग्ररूप धारण केले असून यासाठी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकती व पायपिट करावी लागत आहे. वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा लढा उभारण्यात आला आहे. याकरीता भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सत्यमेव जयते फाऊंडेशनचे अभिनेता अमिरखान यांच्या या अभियानाला सहकार्य करण्याची भूमिका घेवून श्रमदानाच्या या चळवळीला मशिनचा आधार देण्यात येत असून महाराष्ट्रातील तीन हजार गावांना अडीचशे तास जेसीबी मशिन व शंभर तास पोकलॅन्डचा खर्च भारतीय जैन संघटना देत आहे. ही लोकचळवळ उभी व्हावी यासाठी संघटनेची धडपड असून ज्याठिकाणी ग्रामस्थ या अभियानात सक्रिय सहभागी होवून कार्य करीत आहेत. त्याठिकाणी वेळप्रसंगी गरजेनुसार जेसीबी व पोकलॅन्डचे तास वाढविण्यात येणार असल्याची ग्वाही भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी देवून या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

स्थानिक श्री महावीर ब्रम्हचार्याश्रम जैन गुरूकुल येथे भारतीय जैन संघटनेच्यावतीने कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धा २०१८ मध्ये सहभागी झालेल्या गावातील सरपंच मेळाव्यात त्यांनी वरील मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास आ. राजेंद्र पाटणी, भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अभिनंदन पेंढारी, राज्य कार्यकारणी सदस्य प्रदिप जैन, संघटनेचे जिल्हासचिव व तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, गोपाल पाटील भोयर , आर्ट आॅफ लिव्हींगचे डॉ. सुशिल देशपांडे, संघटनेचे तालुकाध्यक्ष समिर जोहरापुरकर, सचिव प्रज्वल गुलालकरी,  नायब तहसिलदार हरणे, समन्वयक ज्योती वानखेडे, उल्हास बांगर,सुहास चवरे, पियुष डोणगावकर, प्रमोद चवरे, कवीश गहानकरी, बानगावकर, श्याम सवई आदिंची उपस्थिती होती. दिपप्रज्वल करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. आ. पाटणी यांनी शासनाचे काम संघटना करीत असून मंगरूळपीर व कारंजा तालुक्यात या अभियानाला आपण सवोर्तोपरी सहकार्य करणार असून डिझेलकरीता लागणाº्या पैशाची समस्या आठवड्यात दूर करणार असून जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व अधिकाºयांची बैठक कारंजा येथे घेवून या अभियानाला गती देणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत चवरे यांनी केले. कार्यक्रमात सरपंचासोबत पदाधिकारी यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रांजल दयार्पूरकर, सुदर्शन दयार्पूरकर, सचिन रेडगे व भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Join Drought-Free Maharashtra's Mission! - Sudarshan Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.