नाती कुटुंब जोडा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:47 AM2021-07-14T04:47:00+5:302021-07-14T04:47:00+5:30

मंगरुळपीर ----आज कुटुंबातील नात्याची वीण उसवली आहे. दिवसेंदिवस कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे, तसेच पर्यावरणातील झाडांचा ऱ्हास झाल्यामुळे सबंध ...

Join grandchildren, avoid environmental degradation! | नाती कुटुंब जोडा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा !

नाती कुटुंब जोडा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा !

Next

मंगरुळपीर ----आज कुटुंबातील नात्याची वीण उसवली आहे. दिवसेंदिवस कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे, तसेच पर्यावरणातील झाडांचा ऱ्हास झाल्यामुळे सबंध जगावर तापमान वाढीचे संकट ओढवले आहे. घर, कुटुंब, पर्यावरण माणसाचे अस्तित्व जोपासतात, पण कृतघ्न माणूस हे सारे विसरत गेला आहे. या अनुषंगाने येथील पर्यावरणाच्या कृतिशील कार्यकर्त्या व अभ्यासक मृन्मयी सुभाष हातोलकर यांनी ‘नाती कुटुंब जोडा पर्यावरणाचा ऱ्हास टाळा’ असे युवा पिढीच्या सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीच्या भावनेला हात घालून कृतीप्रवण बनविणारे अभिनव अभियान ११ जुलैपासून सुरू केले आहे.

मृन्मयी यांनी सर्वप्रथम कल्पनानगर, नामदेवनगर, सहकार वसाहत या परिसरात वृक्ष संगोपनाच्या अटीवर नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार रस्त्यावर दुतर्फा कडूनिंब, वड, जांभूळ, पिपळ, करंजी, बेल, रिठा, बांबू, आवळा, चिंच,आदी वृक्षांचे घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते रोपण करून घेतले. यात अनेक आजी-आजोबांनी सहभाग घेतला होता. याशिवाय आजी-आजोबांचे नाते पर्यावरणाच्या माध्यमातून वृद्धिंगत व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आप्तेष्ट व मित्र परिवार यांच्यापैकी २५ शेतमालकांच्या शेतावर जाऊन त्यांच्या कुटुंबांतील आजी- आजोबाच्या हस्ते, मुले व नातू यांच्या उपस्थितीत प्रत्येक शेतात ५ आब्यांच्या मातृवृक्षाचे रोपण करण्यात आले. अनेक आजी-आजोबांच्या डोळ्यात यावेळी अश्रू तराळले. सर्व कुटुंब नवी-जुनी पिढी पर्यावरण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांनी झुणका भाकरीचे स्वादिष्ट भोजन दिल्याने या उपक्रमाला भावस्पर्शी कौटुंबिक सोहळ्याचे स्वरूप आले. मृन्मयी हातोलकरांना या उपक्रमासाठी पर्यावरण मित्र मंडळाचे सतीश बंनोरे, शरद येवले, राजेश दबडे, संजय तेलंग, साहिल अबिल्डिंगे, अभिजित हातोलकर, सम्यक बनसोड, राजेंद्र जाधव, ईश्वर परंडे, मनीष राजूरकर, राजेंद्र धोपे, दिलीप पाटील, आण्णा साहेब पांनबिहाडे, आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Join grandchildren, avoid environmental degradation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.