संयुक्त जमिन मोजणीची नोटीस मिळाली २७ महिन्यांनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 04:04 PM2019-01-02T16:04:47+5:302019-01-02T16:05:10+5:30
देपूळ : बाधित जमीनीच्या संयुक्त मोजणीसाठी काढलेली नोटीस २७ महीने उशिराने मिळाल्याची तक्रार उमरा (शम) येथील बाधीत कास्तकार लक्ष्मण वसंता येवले यांनी कार्यकारी अभियतां ल.पा.वि. बांधकाम वाशिम यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ : बाधित जमीनीच्या संयुक्त मोजणीसाठी काढलेली नोटीस २७ महीने उशिराने मिळाल्याची तक्रार उमरा (शम) येथील बाधीत कास्तकार लक्ष्मण वसंता येवले यांनी कार्यकारी अभियतां ल.पा.वि. बांधकाम वाशिम यांच्याकडे केली आहे.
येवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माझी जमीन वारा जहॉगीर ल.पा.मध्ये सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये २०१५ सालापासुन बाधीत होत असुन त्या जमीनीचा मोबदला देण्यात यावा याकरिता मी संबंधीत विभागाकडे २६ जुलै २०१६ रोजी निवेदन देवुन मागणी केली होती. यावर दखल घेवुन सहाय्यक अभियंता श्रेणी १ लघु पाटबंधारे उपविभाग क्र.३ मालेगावने १४ सप्टेंबर २०१६ रोजी नोटीसव्दारे ३६०० रुपये संयुक्त मोजणीसाठी भरावयाचे सांगितले होते. पंरतु ही नोटीस मला ल.पा.उपविभाग क्र.३ मालेगावने ७ डिसेंबर २०१८ रोजी म्हणजेच २७ महिने उशिराने रामजी रु बावके, यांच्याहस्ते पाठविली आहे. नोटीस वाचल्यावर सदर नोटीस २७ महिन्याने विलंबाने मिळाल्याने मी, चक्रावुन गेलो . तरी संबधंीत विभागाने माझ्या शेताच्या संयुक्त मोजणीसाठी लागणारे ३६०० रुपये भरुन घेवुन माझ्या शेताची संयुक्त मोजणी करुन घेवुन मला बाधीत जमीनीचा मोबदला देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी लक्ष्मण वसंता येवले यांनी कार्यकारी अभियता ल.पा.वि.बांधकाम वाशिम यांच्याकडे केली आहे.