नागपंचमीनिमित्त चिमुकले घेताहेत झोक्याचा आनंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:25 AM2017-07-27T02:25:58+5:302017-07-27T02:26:01+5:30
शिरपूरजैन: नागपंचमीच्या आदल्या दिवशी ग्रामीण भागात मोठया प्रमाणात झोके बांधले जातात. यावर लहानापासून तर मोठ्यांपर्यंत झोके घेताना दिसून येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन: नागपंचमीच्या आदल्या दिवशी ग्रामीण भागात मोठया प्रमाणात झोके बांधले जातात. यावर लहानापासून तर मोठ्यांपर्यंत झोके घेताना दिसून येतात.
हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याचे खूप महत्व आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रिया व मुलींची मोठी धावपळ असते. तेव्हापासून एकेक सण सुरू होतात. श्रावण हा महिना श्रवणाचा महिना असून या महिन्यात देवाच्या कहाण्या, पोथ्यांचे वाचन केले जाते. श्रावण महिन्यात नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्म हे दिवस महत्वाचे आहेत. नागपंचमी ह्या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लेवून फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर आदीे खेळ खेळतात. शिरपूर परिसरातील शाळा, घरांसमोर झुले बांधून त्याचा आनंद चिमुकले घेतांना दिसून येत आहेत.