धनादेश देण्यासाठी लाच घेणारा कनिष्ठ लेखा अधिकारी जेरबंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:32+5:302021-05-06T04:43:32+5:30

वाशिम : कंत्राटी रोजगार सेवकाच्या थकीत मानधन देयकाचा धनादेश तयार करून कॅश रजिस्टरला नोंद घेण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणारा ...

Junior accounting officer arrested for accepting bribe to issue checks | धनादेश देण्यासाठी लाच घेणारा कनिष्ठ लेखा अधिकारी जेरबंद !

धनादेश देण्यासाठी लाच घेणारा कनिष्ठ लेखा अधिकारी जेरबंद !

Next

वाशिम : कंत्राटी रोजगार सेवकाच्या थकीत मानधन देयकाचा धनादेश तयार करून कॅश रजिस्टरला नोंद घेण्यासाठी १५०० रुपयांची लाच मागणारा मालेगाव पंचायत समितीचा कनिष्ठ लेखा अधिकारी ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. मनोज बिबीचंद जाधव (३३) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

कंत्राटी रोजगार सेवकाचे मागील आठ महिन्यांपासून मानधन रखडले होते. मानधन देयकाचा धनादेश तयार करून कॅश रजिस्टरला नोंद घेण्यासाठी मालेगाव पंचायत समितीचा कनिष्ठ लेखा अधिकारी मनोज बिबीचंद जाधव याने तक्रारदारास १५०० रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केली असता १५०० रुपयांची लाच मागितल्याचे आढळून आले. ५ मे रोजी मालेगाव पंचायत समितीच्या लेखा विभागात सापळा रचला असता आरोपीला लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक शंकर शेळके, सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर परळकर व चमूने केली.

Web Title: Junior accounting officer arrested for accepting bribe to issue checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.