जऊळक्यात जुगारावर धाड; दीड लाखांचा ऐवज जप्त
By admin | Published: July 5, 2017 01:12 AM2017-07-05T01:12:51+5:302017-07-05T01:12:51+5:30
१६ जणांवर गुन्हे : जऊळका पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जऊळका रेल्वे: घरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून दीड लाखांचा ऐवज जप्त करीत पोलिसांनी १६ जणांवर मुंबई जुगार अॅक्टनुसार गुन्हे दाखल केले. जऊळका रेल्वे पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास उमरदरी येथे ही कारवाई केली.
जऊळका पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या उमरदरी येथे घरात जुगार सुरू असल्याची माहिती गुप्तसूत्रांनी पोलिसांना दिली. त्या महितीवरून जऊळका पोलिसांनी उमरदरी येथील उत्तम मोतीराम आडे यांच्या घरात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकली. यावेळी त्यांना १६ जण ५२ ताश पत्त्यांचा खेळ करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून १३ हजार ४२० रुपये रोख, तसेच ४ दुचाकी आणि १० मोबाईलसह एकूण १ लाख ५१ हजार ४२० रुपयांचा ऐवज जप्त केला. या अंतर्गत पोलिसांनी माणिक राठोड, शेषराव राठोड, उमेश उत्तम जाधव, विष्णू बद्री राठोड, निरंजन भगवान राठोड, शामराव मानसिंग राठोड, उत्तम मोतीराम आडे, पप्पू दामोदर राठोड, गोपीचंद रामदास राठोड, सर्व रा. उमरदरी, संजय जयनारायण जयस्वाल, गोवर्धन लोभा राठोड रा. किन्हीराजा, शे. रफिक शे. खलील, शे. मोसीन शे. हसन, संदीप यादव भारती, आशिष ओमप्रकाश मालपाणी, तसेच राजू देशमाने सर्व रा. जऊळका यांच्यावर कलम १२ अ मुंबई जुगार अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार आर. जी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ज्ञानेश्वर राठोड, गणेश बियाणी, पोकॉ. संतोष कोहर, प्रकाश बनसोड, संजय घुले, शिवाजी काळे, रविंद्र खराटे, विजय इंगोले आदिंच्या चमूने ही कारवाई केली.