हिवाळ्यातच काजळेश्वरवासीयांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:33+5:302021-01-18T04:36:33+5:30

वाशिम : काजळेश्वर उपाध्ये गावाला पाणीपुरवठा करणा-या योजनेचे ट्रान्सफाॅर्मर जळाल्याने पाणीपुरवठा १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे हिवाळ्यातच ग्रामस्थांना पाण्यासाठी ...

Kajleshwar people roam for water in winter | हिवाळ्यातच काजळेश्वरवासीयांची पाण्यासाठी भटकंती

हिवाळ्यातच काजळेश्वरवासीयांची पाण्यासाठी भटकंती

Next

वाशिम : काजळेश्वर उपाध्ये गावाला पाणीपुरवठा करणा-या योजनेचे ट्रान्सफाॅर्मर जळाल्याने पाणीपुरवठा १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे हिवाळ्यातच ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र काजळेश्वर येथे पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायतीकडून काजळेश्वर येथे नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आधीच अनियमित वीजपुरवठ्यामुळे या योजनेतून नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. त्यात गेल्या १० दिवसांपूर्वी या योजनेच्या मोटारपंपाचे रोहित्र तांत्रिक बिघाडामुळे जळाले. त्यामुळे पाणीपुरवठा बंदच असून, ग्रामस्थांना आता पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. शेतशिवारातून पाणी आणत ग्रामस्थ आपल्या गरजा भागवत आहेत. तथापि, महावितरणकडून अद्यापही हे रोहित्र दुरुस्त करण्याची तसदी घेण्यात आली नाही. ग्रामस्थांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहून महावितरणने पाणीपुरवठा योजनेच्या मोटारपंपाला वीजपुरवठा करणारे रोहित्र दुरुस्त करावे, अशी मागणी काजळेश्वर येथील राजे ग्रुप संघटनेचे विनोद उपाध्ये यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

--------

मिळेल त्या वाहनाने आणले जातेय पाणी

गेल्या १० दिवसांपूर्वी पाणीपुरवठा योजनेच्या मोटारपंपाचे रोहित्र जळाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी शिवारात भटकंती करावी लागत आहे. यात कोणी दुचाकीने, कोणी ऑटोरिक्षाने, कोणी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने, कोणी बैलबंडीने पाणी आणत आहेत. त्यातच ज्यांच्याकडे वाहनच नाही, अशी मंडळी शिवारात किलोमीटरभरापेक्षा अधिक अंतराहून डोक्यावर पाणी आणत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

===Photopath===

170121\17wsm_2_17012021_35.jpg

===Caption===

हिवाळ्यातच काजळेश्वरवासियांची पाण्यासाठी भटकंती

Web Title: Kajleshwar people roam for water in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.