कामरगावच्या सचिवावर फौजदारी गुन्हा दाखल
By admin | Published: June 6, 2014 12:32 AM2014-06-06T00:32:35+5:302014-06-06T00:33:22+5:30
घरकुल योजनेत अनियमितता भोवली
कामरगाव : निधीचा अपहारास जबबादार असलेल्या सचिवाकडून अपहारीत केलेल्या रकमेच्या वसूली बरोबरच त्यांचेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालय नागपूर यांच्या आदेशाशवरून कारंजा पं.स. चे गटविकास अधिकारी गौतम भगत यांनी ग्रा.पं.चे सचिव सा.हि.चव्हाण यांच्याविरुद्ध धनज पो.स्टे.ला फिर्याद दाखल केली. यावरून धनज पोलीसांनी त्यांच्याविरूद्ध भादंवि ४0९, ४२0, ४७१ कलमानुसार गुन्हा दाखल केला. अल्पसंख्यांक घरकूल योजनेत अनियमितता आढळून आली होती. त्याचप्रमाणे चौकशी अहवाल नुसार खाते चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. गटविकास अधिकारी रिसोड यांनी चौकशी अहवाल सादर करून सचिव चव्हाण दोषी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कार्यवाही शिफारस केली. परंतु , त्यानंतरही कार्यवाही न झाल्याने दिवाकर हिंगणकर न्यायालयात गेले होते.न्यायालयाने याप्रकरणी सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.