कामरगावचे विद्यार्थी झाले चक्क इतिहासकार; शोधला गावाचा इतिहास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:34 PM2018-02-20T14:34:14+5:302018-02-20T14:36:37+5:30

कारंजा : इतर विषयांच्या अध्ययनासोबत इतिहासाचे अध्ययन विद्यार्थी करीत असतात, मात्र कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चक्क आपल्या गावाचा इतिहास शोधून नवा पायंडा पाडला.

Kamargoan students discovered The history of the village | कामरगावचे विद्यार्थी झाले चक्क इतिहासकार; शोधला गावाचा इतिहास 

कामरगावचे विद्यार्थी झाले चक्क इतिहासकार; शोधला गावाचा इतिहास 

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी इतिहासाच्या अध्ययनपद्धती व इतिहासाच्या साधनांचा फक्त शाळेतच उपयोग केला नाही तर इतिहास शोधून प्रत्यक्षात त्याचा वापर केला . कामरगावाच्या इतिहासाचे संकलन करताना अनेक विस्मयचकित करणारे मुद्दे पण समोर आले आहेत .पुर्वीच्या काळातील पिके व आता च्या काळातील पिक यांच्यातील फरक लक्षात घेतला.

- प्रफूल बानगावकर । 

कारंजा : इतर विषयांच्या अध्ययनासोबत इतिहासाचे अध्ययन विद्यार्थी करीत असतात, मात्र कामरगाव जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चक्क आपल्या गावाचा इतिहास शोधून नवा पायंडा पाडला.

शाळा म्हटली की , अध्ययनासाठी तिथे अनेक विषय उपलब्ध असतात , त्यापैकीच  विद्यार्थ्यांचा आवडता विषय म्हणजे इतिहास. इतिहासाची साधने व अध्ययन पद्धती यांचा फक्त वर्गातच उपयोग न करता  त्याचा उपयोग करून प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी गावाचा इतिहास शोधला. जि.प.विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे, संवेदना संस्था, मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख व पर्यावरण शिक्षिका नीता तोडकर, साहेबराव राठोड व  भीमराव सुरळकर यांच्या मार्गदर्शनात  इतिहासाचा शोध व त्याचे लेखन केले . कामरगावाच्या इतिहासाचे संकलन करताना अनेक विस्मयचकित करणारे मुद्दे पण समोर आले आहेत . विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या अध्ययनपद्धती व इतिहासाच्या साधनांचा फक्त शाळेतच उपयोग केला नाही तर इतिहास शोधून प्रत्यक्षात त्याचा वापर केला .पर्यावरण शिक्षिका नीता तोडकरांच्या   मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गावातील धार्मिक स्थळांचा  व वास्तूचा अभ्यास केला. यात झाडबाबा, महादेवाचे मंदिर,  गोदळशहा बाबांच्या दग्यार्ला भेटी दिल्या. जुन्या व पडक्या घरासंदर्भात माहिती घेतली .गावातील वयोवृद्ध नागरिक हारून हाजी आदम मोटलानी, रामचंद्र सखाराम भोने, सुखदेवराव घोडे,  सरस्वती सुखदेवराव घोडे, पंचफुला केशवराव बोंद्रे, पार्वताबाई महादेवराव लाकडे यांची प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेट घेऊन गावाचा इतिहास यांच्याकडून माहिती काढण्यात आली. त्यांच्या काळातील जलव्यवस्थापन, संस्कृती, विद्युत,पाऊस ,पर्यावरण यांची पूर्ण माहिती संकलित करण्यात आली.त्यांच्या काळात वापरला जाणाºया माती व धातुच्या विशेषता काशाच्या भांड्याची माहिती तसेच काशाच्या भांड्याचे आरोग्यदायी महत्त्व समजून घेण्यात आले . तांबे , पितळी भांडे  त्यावेळी  कलही करून वापरल्या जायची. या संदर्भातील माहिती गोळा करण्यात आली विशेषता मातीच्या भांड्यामधे अन्न शिजविन्याच्या पद्धतीचीही माहिती करून घेण्यात आली. गवताची विविध प्रकार जसे पडाय' पवना, माल्हेर ,गोंडेल, कांडेल, सुगरण,लेना , लई, शेवरा, कुंदा, चिपडी, चिकटा बावची,भुईश्परा कुसय, सुई गवत भरपूर प्रमाणात उपलब्ध असायचे पण आता ती फार कमी प्रमाणात दिसते .तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील माळरान, कुरण ,गवत  यांच्यात आता काय बदल झाले हे शोधून काढले.गवताचे प्रकार,  पुर्वीच्या काळातील पिके व आता च्या काळातील पिक यांच्यातील फरक लक्षात घेतला. त्याकाळी धार्मिक सलोखा सुद्धा प्रामुख्याने जपला जायचा. गणपती- मोहरम या सणाना हिंदू- मुस्लिम एकत्र येऊन पानसुपारीचा कार्यक्रम करीत असत. विशेष म्हणजे या गावात कोणत्याही  महापुरुषांचा सार्वजनिक पुतळा बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे पुतळ्यावरून धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रसंग या ठिकाणी उदभवत नाहीत. गोदळशावली बाबाचा दर्गा व झाड बाबांचा दर्गा या दोन्ही ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम दोन्ही प्रकारचे भाविक मोठया आस्थेने जातात. गावाचा इतिहास शोधताना गोपाल खाडे ,वसंतराव चव्हाण  चव्हाण, दिपाली खोडके, संजीवनी सोळंके यांची मदत झाली.

Web Title: Kamargoan students discovered The history of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.