महिला रोजगारासाठी कामधेनू कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:17 PM2017-07-24T13:17:32+5:302017-07-24T13:17:32+5:30
कामधेनू कार्यक्रमाचे माध्यमातून महिलांना शासकीय, निमशासकीय व्यवसायाभिमूख योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
वाशिम : आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबातील गरजू महिलांना घरच्या घरी रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था वाशिमचेवतीने २७ जुलै रोजी किन्हीराजा ता.मालेगाव येथे कामधेनू कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
महिला रोजगारासाठी कामधेनू कार्यक्रमाचे माध्यमातून महिलांना शासकीय, निमशासकीय व्यवसायाभिमूख योजनांची माहिती देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील गरजू महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन स्वयंभु होण्याकरिता पाठपुरावा केला जाणार आहे. गरजू परितक्त्या, विधवा, रोजगार करु इच्छिणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, सुधाकर वाकुडकर, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, भगवान ढोले, राम पाटील, सुमेध तायडे, सुनिल तायडे, सविता पट्टेबहादूर, मंदा ढोले, सुवर्णा डाखोरे, महादेव क्षिरसागर, संतोष हिवराळे, विजय चव्हाण, नाना तेलंग, नितीन अढाव, समाधान करडीले, अरविंद उचित आदींनी केले.