कापशी नदीचे पुनरुज्जीवन!

By Admin | Published: May 28, 2017 04:05 AM2017-05-28T04:05:30+5:302017-05-28T04:05:30+5:30

जलसंधारण विभागाचा पुढाकार; शेतीला मिळणार पाणी

Kapshi river revival! | कापशी नदीचे पुनरुज्जीवन!

कापशी नदीचे पुनरुज्जीवन!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील कापशी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जलसंधारण विभागाने हाती घेतले आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २६ मे रोजी या कामाला भेट देऊन पाहणी केली.
याप्रसंगी कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, जलसंधारण विभागाचे मापारी, रवी भुसारी, कारंजाचे माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, डॉ. राजीव काळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कापशी नदीचे सुमारे २ किलोमीटर पयर्ंत रुंदीकरण व खोलीकरणचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुमारे ८00 टीसीएम पाणीसाठा निर्माण होईल, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने आजूबाजूच्या शेतीला सिंचनाची सोय होणार आहे, तसेच पुराचा धोकाही कमी होईल, अशी माहिती जलसंधारणचे मापारी यांनी यावेळी दिली. गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी या कामाची पाहणी केली. कामाचा दर्जा असाच चांगल्यारितीने राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Kapshi river revival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.